बिलोलीतल्या मतदारांचा आशीर्वाद मला विजयापर्यंत पोहोचवला – खासदार वसंतराव चव्हाण

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

बिलोलीत पार पडला नागरी सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यात लोकसभेत एकीकडे धनाढ्य व मातब्बर पक्षाची नेते मंडळी असतांना उलट आमच्याकडे कसलीही साधने व यंत्रणा नव्हती तरीही मतदारांनी निवडणूकीत मला प्रचंड मतांनी विजयी केले.ज्यात बिलोली च्या मतदारांचा मोठा वाटा राहीला.बिलोलीतील मतदारांच्या ऋणातून उतराई कदापिही होणे शक्य नाही असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी बिलोली येथील नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी केले आहे.

 

बिलोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील आनंद गार्डन मंगल कार्यालयात गुरुवारी खासदार वसंतराव चव्हाण यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,प्रदेश काँग्रेस कमिटीचे केदार पाटील साळुंखे,माजी सभापती संजय बेळगे आदी मंचावर उपस्थित होते.प्रारंभी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष वलिओद्दीन फारुखी यांनी आपआपल्या स्टाईल मध्ये दमदार भाषणे केली.फारुखी यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण,आणि मताधिक्य दिलेल्या शहरातील देशमुखनगर येथील पाण्याच्या संबंधी असलेली अडचण सोडवण्यासाठी खा.चव्हाणांकडे मागणी केली.

 

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना वसंतराव चव्हाण यांनी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बिलोलीकर व तालुकावासियांनी,महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी विजयासाठी परीश्रम घेतले. त्या परीश्रमातुन हा विजय साकारला आहे.माझ्यासारख्या सामान्य नेत्यास बिलोलीतल्या जनतेने संधी दिली त्यांचे मोठे उपकार आहेत यातून उतराई होणार नाही असे सांगून सर्व विभागाचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सोबतच काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊनसुद्धा निवडणुकीत अलिप्त राहिलेल्या आमदार जितेश अंतापुरकर यांचा समाचार त्यांनी समाचार घेतला.

 

यावेळी माजी सभापती संजय बेळगे,केदार पाटील साळुंखे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांची भाषणे झाली

 

जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष गंगाधरराव सोंडारे , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव सोनकांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे,उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवराज बामणे,सुनिल एंबडवार,युवा सेनेचे बालाजी पाटील शिंदे,आदी उपस्थित होते.दरम्यान राष्ट्रवादीचे सुभाष गायकवाड,माजी अध्यक्ष भिमराव जेठे,निवर्ती कांबळे, गंगाधर सोनकांबळे,यांनी आगामी देगलुर विधानसभेसाठी बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादु नका अशी भुमिका मांडली. या भुमिकेला उपस्थितांनी टाळ्या वाजवुन प्रतिसाद दिला आहे.

 

हा सत्कार सोहळा तालुका काँग्रेस कमिटी सह,माजी नगरसेवक प्रकाश पोवाडे,आमजद चाऊस,अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे वलिओद्दीन फारुखी , वसिम फारुखी यांनी परिश्रम घेतले तर यावेळी नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ गंगाधरराव सोनकांबळे यांनी खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे शाल,म़ोठा पुष्पहार संविधानाचे पुस्तक देउन सत्कार केला यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील,उबाठाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार बामणे,राशप चे तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा महासचिव किशनराव रावणगावकर, जिल्हा महासचिव माजी नगरसेविका प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड,उपाध्यक्ष अनिलराव उबाळे,तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक पत्रकार प्रकाश पोवाडे,प्रकाश प्रचंड इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!