नांदेड येथे ओबीसी संवाद बैठक संपन्न…
गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी उपस्थित ओबीसी प्रमुखांना संबोधित केले.
नांदेड दि. 20 – विश्रामगृह, नांदेड येथे शुक्रवार, दि. 19 जुलै रोजी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख उपस्थितीत ओबीसी संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी उपस्थित ओबीसी प्रमुखांना संबोधित केले. या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. शेवटी अध्यक्षीय भाषणात या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सविस्तर माहिती देवून, आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींनी एकत्र येऊन राजकीय लढा देण्यासाठी आवाहन केले.

यावेळी ओबीसी नेते एस.जी. माचनवार, डॉ. बी.डी. चव्हाण, वंचितचे प्रवक्ते फारूक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, संघटक श्याम कांबळे, पी.पी. फांजेवाड, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, अविनाश भोसीकर, चंद्रसेन पाटील, बालाजी खर्डे, सतीशचंद्र शिंदे, राजेश चिटकुलवार, श्रीमंत राऊत, अॅड. माणिक वाखरडे, गोडसे महाराज, एकनाथ बत्तलवाड, राजू मामुलवार, दत्तात्रेय तोकलवाड , गणेश घोरपडे प्रा दत्ता कुंचलवाड, प्रा आरक्षण डी शिंदे , इंजी . प्रकाश व्यंकटपूरवार व सर्व ओबीसी समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.