केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षदा – खा.वसंतराव बळवंतराव चव्हाण

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी नुकतेच अर्थसंकल्प सादर केले या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटयला वाटण्याच्या अक्षदा दिल्यामुळे महाराष्ट्राने हा अर्थसंकल्प नाकारला असून त्यात नांदेड चे खा. वसंतराव चव्हाण यांनी सुद्धा सहभाग नोंदविला असून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपाने आंध्र प्रदेश आणि बिहारच्या वाट्याला भरपूर असं दिलं पण सर्वात जास्त आर्थिक वाटा असणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र या अर्थसंकल्प काहीच निधीची तरतूद केली नाही.

यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी या अर्थसंकल्पाला नकारात्मता दर्शवली यावेळी *नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण* हे अग्रस्थानी होते.

हे सरकार नाही कोणाचे.. ना जनतेचे ना हिताचे,

एवढेच यांना कळते..भले करणे स्वतःचे आणि त्यांच्या मित्रांचे..!

महाराष्ट्रातले उद्योग-प्रकल्प गुजरातला पळवले,लोकहिताच्या अभिनव योजना बंद पाडल्या,देशाला सर्वाधिक महसूल व कर भरणाऱ्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीही दिले नाही..यांच्या पायी शैक्षणिक क्षेत्रालाही भ्रष्टाचाराची वाळवी लागली..महागाई गगनाला भिडली,बेरोजगारी शिगेला पोहोचली,गुन्हेगारी फोफावली, कायदा-सुव्यवस्था ढासळली, महिला सुरक्षा उघड्यावर पडली, लुबाडू लबाड सरकारची आश्वासने हवेत विरली…महाराष्ट्रात एन डी ए चेगुजरात धार्जिन सरकार असूनही महाराष्ट्राच्या वाट्याला वाटण्याच्या अक्षदा ही फार दुर्दैवी बाब आहे.असे ही आवर्जून खा.वसंतराव चव्हाण यांनी बोलताना म्हणाले 

मोदी सरकारनने सादर केलेले हे अर्थसंकल्प भारताच्या संघराज्य प्रणालीच्या विरोधात आहे.या अर्थसंकल्पाची आकडेमोड केली तर सम्पूर्ण मराठवाड्याला काहीच मिळाले नाही.त्यामध्ये रेल्वेचा प्रश्न अतिसवेधन शील असूनही या अर्थ संकल्पत मुदामहून दर्लक्ष करण्यात आले आहे.

हे सगळे थांबलेच पाहिजे.. जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला आणि महाराष्ट्राला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.. 

त्या मुळे महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसच्या खाजदारानी लोकसभाच्या दालना समोर धरणे आंदोलन केले व एक संकल्प करण्यात आला असून जीवाचे रान करून यावेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू एकच ध्यास लढू आणि जिंकू..खा.वसंतराव चव्हाण

Share This Article
error: Content is protected !!