महसूल कर्मचारी मोर्चात रेती माफिया जोशात

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्या मधील सगरोळी येथील प्रशासनाने शासकीय रेती डेपोची निर्मिती केली असून सर्व सामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना याचा लाभ मिळावा म्हणून ही योजना राज्य सरकारने तयार केली.पण तसे न होता महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्या ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी,ग्रामसेवक शासकीय डेपोवर नाहीत.

 तरी देखील ऑनलाइनच्या नावाखाली रेती माफिया हे झिरो मध्ये रेती चालवत आहेत. झिरो म्हणजे ब्लॅक मध्ये विकत असून ही रेती तेलंगणा,कर्नाटका तसेच लातूर,सोलापूर या ठिकाणी जात आहे.महसूल प्रशासन सोडा पण पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करत आहे.

Share This Article
error: Content is protected !!