सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ९००० ची लाच घेताना चतुर्भूज

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड -वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणार्या २० प्रशिक्षणार्थी चालक नापास झाले होते ते पास करण्यासाठी तडजोडी अंती ९००० रुपयाची लाच घेताना

भुषण जवाहर राठोड वय 34 व्यवसाय नोकरी सहा.मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड वर्ग यांना लाच लुचपत प्रतिबंध विभाग नांदेड यांनी दि.25 जुलै रोजी रंगेहात पकडले आहे.

  यातील तक्रारदार हे श्री.गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत.सदर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते.सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 10,000 हजार रुपये लाचेची मागणी केले बाबत

तक्रार यांनी समक्ष हजर राहून तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची आज दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात आलोसे यांना तक्रारदार यांचे कडून तडजोडीअंती पंचासमक्ष 9000/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेवर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!