भोकर प्रतिनीधी/गोविंद चिखलवाड
भोकर- राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्र बारड यांच्या वतीने दिनांक 24 वार बुधवार रोजी सुरक्षा जनजागृती विषय जनतेस माहिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून वाहनाची होत असलेल्या अपघातामुळे अनेक जणांचे जीव गेल्याचे दिसून आले आहे. तसेच भोकर तालुक्यातील मार्तुळ येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने जागीच चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे अत्यंत दुर्देवी घटना आहे. अपघाताची संख्या वारंवार वाढत चालली आहे सर्वात जास्त भोकर तालुक्यात अपघाताचा प्रमाण वाढत आहे.
वाहन चालवताना काही महत्त्वपूर्ण सुरक्षा बाळगावी अशा संदर्भामध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड पीआय पठाण साहेब, पीएसआय हनुमंतराव येलगुलवार व तसेच त्यांच्या सहकारी कर्मचारी सोबत जनतेस महत्त्वाचे वाहनाविषयी जनजागृती करण्यात आले . भरधाव व बेभाम पद्धतीने वाहन चालविणे, नशा करून वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, वाहन रॉंग साईडने चालवणे, चुकीच्या पद्धतीने वाहने ओलांडणे, रस्ता क्रॉस करताना काळजी न घेणे, आधी अपघाताची कारणे आहे…
विना हेल्मेट वाहन चालवण्याने मृत्यू संकेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. हेल्मेट विषयी महत्व जनतेस पटवून दिले. हेल्मेटचा वापर करावा .अपघात टाळण्याकरिता नियम पालन करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड यांच्यावतीने करण्यात आले.