नांदेड ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश
माहूर तालुका प्रतिनिधी पंडित धुप्पे
माहूर – घर बांधकामासाठी घेण्यात आलेले होम लोन देताना चुकीचे कारण देणे,ग्राहकास आर्थिक,मानसिक त्रास देणे , ग्राहकासी असभ्य वर्तन करणे, सक्तीने हप्ता वसुली करणे इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी माहूर येथील महिंद्रा होम फायनान्स ला नांदेड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 15 हजाराचा दंड व 70500 रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
तक्रारदार पंडित दामोधर धुप्पे राहणार वानोळा तालुका माहूर जिल्हा नांदेड यांनी घर बांधकामासाठी महिंद्र होम फायनान्स माहूर कडे कर्ज म्हणून एक लाख रुपये यांचे प्रस्ताव दाखल केले होते ते एक लाख रुपये करारानुसार मंजूर करण्यात आले त्यापैकी 29 हजार 500 रुपये पहिला हप्ता अर्जदारास देण्यात आला होता. बेसमेंट चे बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकामाचे फोटो व दहा कोरे चेक दिल्यावर उर्वरित 70500 रुपये अर्जदारास देण्यात येतील असे फायनान्स ने सांगितले होते त्यानुसार अर्जदाराने बेसमेंटचे बांधकाम करून कामाचे फोटो आणि दहा कोरे चेक महिंद्रा फायनान्स ला जमा केले होते. परंतु फायनान्सने उर्वरित 70 हजार पाचशे रुपये अर्जदारास दिलेच नाही व दिलेल्या 29 हजार 500 रुपयांचा हप्ता वसुली म्हणून बँकेतून दहा हजार रुपये वसूल केले ही बाब अर्जदाराने कंपनीच्या लक्षात आणून दिले. कराराप्रमाणे अर्जदारास एक लाख रुपये मिळायला पाहिजे होते आणि त्या एक लाखाचा हप्ता थकीत राहिल्यास अर्जदारावर योग्य ती कार्यवाही कंपनी ने करावयास पाहिजे होते. मात्र कंपनीने पूर्ण कर्ज न दिल्याचे व कराराप्रमाणे पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचे व ती रक्कम मिळेपर्यंत पुढील हप्ते भरणार नसल्याचे लेखी कळविण्यात आले होते परंतु फायनान्स कंपनीने अर्जदाराच्या लेखी तक्रारीवर विचार न करता अर्जदारास फोन करणे, मेसेज पाठवणे, राहत्या घरी येऊन सक्तीने हप्ता वसुली करणे, दमदाटी करणे, बँकेतील रक्कम परस्पर हप्तापोटी कपात करणे इत्यादी चुकीचे व्यवहार कंपनीने अर्जदारांसोबत केले होते या गैरव्यवहार व दमदाटी प्रकरणी तक्रार माहूर पोलीस स्टेशनला ही देण्यात आली होती पोलीस स्टेशन ने सदरचा मुद्दा ग्राहक मंच निवारण आयोगाशी निगडित असल्याचे सांगून महिंद्रा होम फायनान्स ला यापुढे अर्जदाराची सक्तीची वसुली करू नये, दमदाटी करू नये अशा सूचना दिल्या होत्या .
अर्जदार पंडित धुप्पे यांनी नांदेड येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये रितसर तकरार दिली होती. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांनी सर्व बाबी पडताळून बघितल्या आणि अर्जदार हा करारानुसार एक लाख रुपयाचे कर्ज मिळण्यास कायदेशीर हकदार आहे त्याचा कायदेशीर हक्क कायम ठेवून अर्जदारास उर्वरित 70 हजार पाचशे रुपये आणि अर्जदारास मानसिक व आर्थिक त्रास दिल्यामुळे दहा हजार रुपये दंड आणि दावा खर्च पाच हजार रुपये आदेश दिल्याच्या तारखेपासून 45 दिवसाचे आत देण्याचा आदेश महिंद्रा फायनान्स कंपनी नी अर्जदारास द्यावा असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पी पाटील, सदस्य श्रीमती शलाका पी ढमढेरे, ज्ञानेश्वर एस पवार यांनी दिला आहे .तक्रारदाराची बाजू एडवोकेट अविनाश चौधरी यांनी मांडली तर महिंद्रा होम फायनान्स कंपनीचे वकील एडवोकेट म. मोहीओदिन यांनी बाजू मांडली आहे.
या निकालामुळे महिंद्रा होम फायनान्स हे ग्राहकाशी चुकीच्या पद्धतीने व्यवहार करतात व ग्राहकाला मानसिक आणि आर्थिक त्रास देतात हे सिद्ध होते त्यामुळे महिंद्रा होम फायनान्स कडून कर्ज घेऊ नये या कंपनीचा परवाना शासनाने रद्द करावा याकरिता तक्रारदार पंडित धुप्पे यांनी आरबीआय व राज्यपाल यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले.