नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता.प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील गावातील अंतर्गत रस्त्यामध्ये चिखलाचे साम्राज्य व रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे व चिखलांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आहे.

आणि  गावातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य माजल्याने शाळेकडे जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना करावी लागत आहे तारेवरची कसरत. गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये दर वर्षी आणि पावसाळ्यामध्ये गावातील सर्व अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य मोजत असून याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे मुख्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. निवडणुका जवळ आले की गावामध्ये अनेक नेते मंडळी येऊन आश्वासनाचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून मात्र विकास कामाच्या बाबतीत हुस्सा हे गाव विकासापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहिले असून गावामधील अंतर्गत रस्ते केव्हा होतील याची उत्सुकता मात्र गावातील गावकऱ्यांना असल्याचे दिसून येत आहे. गावामध्ये मुख्य रस्ता असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य जमले असून यामुळे गावातील नागरिकांना महिलांना व वयोवृद्ध नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावामध्ये अंतर्गत रस्त्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रतीक्षेत असून गावामध्ये केवळ नेतेमंडळींचे आश्वासन देऊन गावाला अंधारात ठेवले आहे विकास काम करण्याच्या वेळी मात्र सगळे नेते मंडळी झोपेचे सोंग घेत आहेत.

 

यामुळे गावातील नागरिकांची व शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी कसरत पहायला मिळत आहे. व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी कर्मचारी यांना मात्र चिखलामधून प्रवास केल्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील दिसून येत आहे. म्हणून सदर गावातील रस्ते त्वरित करण्याची गावकऱ्यांची मागणी होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!