नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ला नांदेड शहरासह जिल्ह्याची शान व ऐतिहासीक वारसा आहे. गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे. पण काही गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची दुरावस्था झाली आहे.
किल्ल्याच उत्तम संवर्धन आणि डागडुजी केल्यास नांदेड पर्यटनासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांसाठी आपला नंदगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरणार आहे. हा केवळ किल्ला नसून नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा आहे.आणि तो जपण्यासाठी नंदगिरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी वयक्तिक लक्ष वेधले असून त्यासाठी आवश्यक असणारा निधी देखील देण्याची घोषणा आज नंदगिरी किल्ल्यास दिलेल्या भेटीत माझ्याकडून करण्यात आली आहे.
तात्पुरत्या स्वरुपात त्या ठिकाणी माझ्यावतीने दगडी चुरी टाकण्यात आली आहे. आजच्या दौऱ्यात नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेणारे “नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार” नामक युवा शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते.
त्या सर्व युवा वर्गाचे मी विशेष अभिनंदन करू इच्छितो आपल्या नांदेड शहराची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी हे सर्व युवा गेल्या अनेक दिवसांपासून घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे.