नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड दि. 31 -नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षकपदी शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा उपसरपंच प्र. एकनाथ बत्तलवाड ब्राह्मणवाडेकर यांनी शहाजी उमाप हे नांदेडकरांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढून त्यांचा यथोचित ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला.
पुढे बोलताना ब्राह्मणवाडेकर म्हणाले की, शहाजी उमाप हे मागील आठ-दहा वर्षापूर्वी नांदेडला पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नांदेडकरांना वाहतुकीच्या बाबतीत शिस्त लावून दिली होती, हे नांदेडकर कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीवर आळा बसवला होता, त्यामुळे तेव्हाच्या काळात क्राईम हा नांदेडकरांना कमी प्रमाणात जाणवला. भविष्यातही त्यांच्याकडून नांदेडकरांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा शहाजी उमाप हे पूर्ण करतील, असेही ब्राह्मणवाडेकर म्हणाले.