हिमायतनगर / बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – आज दिनांक १ आॅगस्ट २०२४ रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर येथे डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना हिमायतनगर व संजीवनी हॉस्पिटल हिमायतनगर यांच्या वतीने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ हिमायतनगर यांच्या तर्फे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते .
यावेळी भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.तसेच यावेळी या भव्य रक्तदान शिबिरास ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष हतवेगळे , संतोष बनसोडे, सुभाष दादा दारवंडे गंगाधर गायकवाड दिघीकर, संजय गुंडेकर ,डॉ अण्णाभाऊ साठे क्रांती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष संदीप गुंडेकर, संजिवनी हॉस्पिटलचे डॉ.प्रेमकुमार वाघमारे, सचिन वाघमारे, हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष बालाजी बनसोडे, बालाप्रसाद वाघमारे,विद्यानंद वाघमारे, दिनेश राठोड, आकाश गुंडेकर,राजु गायकवाड, विजयभाऊ लोणे,नंदकुमार राऊत, रुपेश पोतारे,विकास मनपूर्वे,बालाजी शिराणे,सचिन गुंडेकर,प्रतीक दारवंडे,रवी शिराने, चंदू भालेराव, आणि डॉ अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ हिमायतनगर आणि सामाजिक कार्यकर्ते व नवयुवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.