मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घ्यावी – बालाजी बच्चेवार

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव – महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून सदर योजनेचा लाभ नायगाव मतदार संघातील सर्व गोरगरीब महिलांना देण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी व सदर योजनेतून कोणत्याही घटकातील महिला वंचित राहू नये यांची खबरदारी घेण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार यांच्या महायुती सरकारने, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या विभागाकडे जबाबदारी दिली आहे. अशा अधिकारी व सर्व कर्मचारी या सर्वांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकातील महिला पर्यंत पोहोचवण्यासाठी मिशन मोडवर काम करावे तसेच कोणीही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे. या योजनेचा लाभ सर्व स्तरातील गरीब वंचित महिला पर्यंत पोहोचल्यास आपल्याला पुण्य काम केल्याचा आनंद मिळेल. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकास्तरावर प्रशासनातील अधिकाऱ्यांना रोज गावांना भेटी देऊन व खालच्या गाव स्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी सर्व घटकांतील महिलांना लाभ द्यावा या कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करावी कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे यांची काळजी घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!