८६- नांदेड उत्तर मतदार संघातून पक्षांने संधी दिल्यास निवडणूक लढवणार – प्रफुल सावंत

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

पक्षश्रेष्टीकडे केली उमेदवारीची मागणी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड -काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम करून संघटन कौशल्य निर्माण करून अनेक गोरगरीब सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणारे तथा माजी मंत्री डी पी सावंत यांच्या सहवासात असताना काँग्रेस पक्षाला उत्तर मतदारसंघांमध्ये विविध निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी प्रफुलदादा सावंत यांनी काम केले आहे.

त्यामुळे नांदेड उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून पक्षश्रेष्ठीने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाची बोलताना सांगितले
सविस्तर वृत्त असे की मागील २५ ते ३० वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे तथा काँग्रेसचे पुर्ण वेळ सक्रिय कार्यकर्ते प्रफुलल् दादा सावंत यांनी विविध उपक्रम राबवून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केलं आहे.

त्यांनी सुरुवात फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणाऱ्या सम्यक आंदोलन या छोट्याशा संघटना पासून केले सम्यक आंदोलनाच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केलं अनेक विकासकामाबाबत शासन स्तरावर त्यांनी पाठपुरावा करून अनेकांना न्याय दिला त्याचबरोबर समाज उपयोगी उपक्रम राबविले त्यात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर घेऊन त्यांनी मोफत आरोग्य सूविधा गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या त्याचबरोबर त्यांनी इतर सामाजिक उपक्रम व्दारे त्यांनी उत्तर मतदार संघांमध्ये अनेकांना मदत केली आहे, मतदार संघांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत म्हणुन त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे.

गावोगावी सर्व कार्यकर्त्यां सोबत चांगले संबंध असून लहानापासून मोठ्यापर्यंत प्रफुलदादा सावंत हे सामान्य जनतेचे काम करत असतात मतदारसंघातील कोणत्याही अडी अडचणी त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने हाताळल्या असून गरिबांना न्याय देण्याचे काम केले आहे त्यामुळे उत्तर मतदारसंघातील सर्वच गावातील व शहरातील नागरिक त्यांना जिव्हाळ्यांनी आपलाच माणूस आहे असे सांगतात प्रत्येकाचा आग्रह आहे की प्रफुलदादा सावंत यांनी नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक लढवावी त्या अनुषंगाने दादांनी पक्षश्रेष्ठीकडे नांदेड उत्तर मतदारसंघाच्या तिकिटाची मागणी केली आहे.

पक्षाने त्यांना संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमाला सांगितले आहे प्रफुल दादांनी अनेक उपक्रम राबवून पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर मतदारसंघाचा विकासा कामात हातभार लावला आहे.

त्यामध्ये त्यांनी विभागीय प्रादेशिक प्राधिकरण सदस्य असताना परिवहन कार्यालयात अनेक गोरगरीब ऑटो चालक वाहन चालक यांच्यासाठी विविध शिबिरे राबवून त्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास व त्यांना मदत करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे त्याचबरोबर बेरोजगारांसाठी त्यांनी बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करून अनेकांच्या हाताला काम देऊन बेरोजगारी हटवण्याचे काम केलं आहे सम्यक आंदोलन या छोट्याशा संघटनेचे कार्य जोमाने सुरू असतानाच नंतर त्यांनी मात्र काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी पक्ष मोठ्या हिमतीने वाढवला आहे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये राहून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं आहे.

जिल्हा सरचिटणीस शहर सरचिटणीस सह विविध पदे भूषवून असताना त्यांना डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबिरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तथा प्रभारी हिंगोली जिल्हा पद त्यांना काँग्रेसच्या वतीने बहाल करण्यात आले व या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर पक्षाचे कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रफुल्ल सावंत यांना कार्यकर्त्यांनी विनंती करून नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे त्यामुळे त्यानी तयारी दर्शवली आहे.

 

प्रफुल्ल दादा सावंत यांनी कार्यकर्त्यांसह नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कडे नांदेड उत्तर मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे जर पक्षाने संधी दिल्यास उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

 

पक्षाने अतिशय जुन्या व तळागाळातील कार्यकर्ते असणाऱ्या प्रफुल दादा सावंत यांना एक संधी देऊन उत्तर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सहकार्य करून त्यांना तिकीट द्यावे अशी काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्याची मागणी होताना दिसत आहे.

Share This Article
error: Content is protected !!