दत्तमांजरीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

तर गुन्हे दाखल करण्याच्या परवानगी मागणी चा बिडीओचा जिल्हा परिषदेला अहवाल

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील माहूर तालुक्या मधील मौजे दत्तमांजरी येथे तत्कालीन सरपंच विमलबाई बळीराम पवार आणि ग्रामसेवक एल.एल.पपुलवाड यांनी संगणमताने कसल्याही प्रकारचे विकास कामे न करता ग्रामपंचायत दत्तमांजरी येथील १४ व्या वित्त आयोगातील निधी तेरा वेळा उचलून रक्कम हडप केली आहे.त्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी असा लेखी अहवाल पंचायत समिती माहूरचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दि.८ऑगस्ट २०२२ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे सादर केला आहे.

 चौकशी अहवाल देवून दोन वर्ष झाली परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने दत्तमांजरी येथील माजी उप सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनोज किर्तने कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.१५ जुलै ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी वरिष्ठाना पाठविलेल्या अहवालात पंधरा लाख ९३ हजार विस रुपये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी परस्पर उचलून विकास कामे न करता निधी हडफ केल्याचे स्पष्ट शब्दात चौकशी अहवालात नमूद केले आहे. गावाच्या विकासाचा सोळा लाख रुपये शासनाचा विकास निधी खाऊनही प्रशासन दोन वर्षापासून भ्रष्टाचाऱ्यांना का वाचवत आहे.तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती वरिष्ठाकडे केली आहे.

जि.प.च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)श्रीमती जाधव यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून लवकर कारवाई झाली नाही तर पुढील आठवड्यात जिल्हा परिषद नांदेड समोर उपोषणास बसावे लागेल अशी भूमिका मनोज कीर्तने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मनोज किर्तने  माजी उप सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, दत्तमांजरी ता.माहूरजि.नांदेड.   मो.9421758788

Share This Article
error: Content is protected !!