शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे अनाधिकृत होल्ड काढण्यासाठी प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांचा बँकेत ठिय्या

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याला झाले बँक मॅनेजरचे दर्शन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनेच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा होत आहे. पण त्याचा उपयोग शेतकऱ्याला वेळेवर घेता येत नाही अशा अडचणी युवक काँग्रेसच्या लक्षात आल्या बँकेचे कर्मचारी पीक कर्जाचे कारण सांगून अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावून बघत आहेत ही गोष्ट प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली व तक्रार सांगितली या सगळ्या तक्रारी लक्षात घेऊन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी तालुक्यातील युवक काँग्रेसला एकत्रित जमण्याच्या सूचना दिल्या व व स्वतः पुढाकार घेऊन जवळपास 100 ते 200 शेतकरी ज्यांच्या खात्याला होल्ड लागलेले आहेत असे शेतकरी सोबत घेऊन बँकेत ठिया घातला व काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि युवा नेते प्रा. रवींद्र चव्हाण यांनी बँक मॅनेजर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे याची जाणीव ठेवून काम करा असे ठणकावून बँकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना बजावण्यात आले.

 सोबत आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे होल्ड त्वरित काढण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले. 

यानंतर जर अनाधिकृतपणे कुठल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावण्याचा प्रयत्न आणि ते पण शासनाचा या बाबतीत कुठलाच जी.आर. नसताना बँकेला जर होल्ड लावले जात असतील तर बँकचे कामकाज चालू देणार नाही शेतकऱ्यावर होणारा अन्याय सहन केल्या जाणार नाही अशी सूचना बँक मॅनेजरला यावेळी प्रा.रवींद्र चव्हाण यांनी दिली

 नायगाव मतदारसंघाचे आमदार या शेतकऱ्याच्या या समस्येकडे लक्ष न देता मतदानाच्या हव्यासापोटी लोकांना देवदर्शन करून आणण्याची वारी सुरू केली आहे तर युवक काँग्रेसने अडचणीवर मात करत बँक मॅनेजरच्या दर्शनाची आगळी वेगळी भूमिका या ठिकाणी घेतली आहे.

Share This Article
error: Content is protected !!