वारकरी,पैलवान,सह शासकिय सेवेकरांचे गाव म्हणुन जिल्ह्यात प्रसिध्द – सरपंच सौ.चंद्रभागाबाई पुंडलीक काईतवाड
विशेष प्रतिनिधी/माधव काईतवाड
हिमायतनगरः. तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत लागण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे गेल्या दोन तिन वर्षात लागलेल्या नौकरी वरुन दिसत आहे.येथील कु गीता देवन्ना शेन्नेवाड यांची संभाजीनगर पोलिस म्हणून तर शिवराम कैलास काईतवाड यांची नांदेड येथे पोलिस म्हणून नियुक्ती झाली आहे.
येथील जाज्वल्य देवस्थान मारोती रायाच्या कृपेने व वैकुंठवाशी.ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या पावनपर्शाने माळकऱ्यांचे गाव म्हणुन प्रसिध्दी मिळवलेले.यात गावचे लौकिक म्हणजे कुस्तीचा पैलवान म्हणुन पंचक्रोशीत प्रसिध्दी मिळवुन ते पोलीस खात्यात Api पोस्टवर जाणारे दत्ता हाशेप्पा काईतवाड व त्यांचे लहान बंधु बालाजी हाशेप्पा काईतवाड यांनी पण कुस्ती फड ते पोलीस खाते असा त्यांचा प्रवास गावातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. सातारकर महाराजांचे शिष्य ह.भ. प. माधवराव महाराज बोरगडीकर यांच्या अफाट कष्टाने हजारो शिष्य तयार झाले असून, बोरगडी गावाचा विविध क्षेत्रात कायापालट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.श्रीक्षेत्र बोरगडी गावांचे दहा -पधरा वर्षांपूर्वी चे आणि आजच्या अवस्थेत चित्र स्पष्ट दिसत आहे. गावात गायणाचार्य. टाळकरी, भागवताचार्य, किर्तनकार, पैलवानदुधव्यवसाय, शेती.छोटे-मोठे व्यवसायिक आस्थापणे.राजकिय क्षेत्रात. सह आता शासकिय सेवेत सुध्दा गावातील युवकांची भरारी पहावयास मिळत आहे.किर्तन क्षेत्रात गायणाचार्य.साहेबराव शेन्नेवाड यांच्या सह त्यांचे चिरंजीव लक्ष्मण शेन्नेवाड महाराज यांच्या किर्तन, प्रवचनाला भाविक चांगली दाद देत आहेत.येथील काईतवाड परीवरासह जक्कलवाड, शेन्नेवाड.भैरेवाड या परीवारातील अनेक जणांची शासकीय सेवेत वर्णी लागली आहे. झेंडुच्या उत्पादनात,दुध व्यवसायात येथील शेतकरी अग्रेसर असल्याचे दिसत आहे,
अनेक गावात पुर्वी पेक्षा आजच्या अवस्थेत तरुण युवक व्यसनाकडे वळल्याचे प्रमाणात वाढ होत असली तरी श्रीक्षेत्र बोरगडी येथील युवक, तरुण शासकीय सेवेकडे झुकत असुन ज्यांना शासकीय सेवेत संधी मिळाली नाही अशा युवकांनी हिमायतनगर सारख्या ठिकाणी व्यवसायाकडे वळत आहेत.एकदरीत या गावातील प्रामाणिक पणाला आजही वाव आहे.येथील अनेकांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. येथील प्रथम इलेक्ट्रीकल व्यावसायीक विलास पाटील बोरगडीकर चाळीस वर्षापासून सातारकर महाराजांच्या फंडात…. लाऊड स्पीकर , रेडिओ चे मेकानिक म्हणून सुरुवातीला काही वर्षे व्यवसाय करणारे विलास पाटील बोरगडीकर गावांतील हनुमान मंदीरातील लाऊड स्पीकर ची मोफत देखभाल करायचे.वै.ह भ प बाबा महाराज सातारकर यांचे सातत्याने या गावी किर्तन होत असत त्यावेळी साऊंड सिस्टीम ची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असत.त्याचे काम लक्षात घेऊन सातारकर महाराजांनी त्यांना पंढरपूर येथील फंडात आषाढी एकादशी उत्सव, कार्तिक पौर्णिमेला याव अशी सुचना बाबा महाराज सातारकर यांनी करताच चाळीस वर्षापासून २०२४ पर्यंत आजही सातारकर यांच्या फंडातील किर्तना प्रसंगी साऊंड सिस्टीम ची जबाबदारी विलास पाटील बोरगडीकर निस्वार्थ पणे सांभाळत आहेत.आपल्यासह परीवाराना ख्यातनाम किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या मुळे मानसीक समाधान मिळते असे गावच्या महिला सरपंच सौ.चंद्रभागाबाई पुंडलीक काईतवाड यांनी लोकतंत्र न्युज लाईव्ह सी बोलुन दाखवले.