जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या वारसाना नवीन पीक कर्ज मिळवून द्या – गणेश गिरी यांची मागणी

abhishek bakkewad
5 Min Read
Spread the love

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीक कर्ज योजनांचा लाभ द्या…नागनाथ माळगे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केली होती योजनेचा अंमलबजावणी करिता ठेवण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही विशेष म्हणजे सुरुवातीलाही प्रकरणे आधार प्रमाणीकरणामुळे अडकली असल्याचे बँकेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते यापैकी अनेकांनी आधार प्रमानीकरण करूनही योजनेचा लाभ मिळत नसल्याने नेमकी आडकाडी का व कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे बँकेच्या कर्तव्यामध्ये कसूर आहे.

 का?नवीन सरकार आले.मुखमंञी साहेबांनी या विषया कडे लक्ष घालुन मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांकडून मागणी होतं आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा धर्माबाद व शाखा येताळा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा धर्माबाद व शाखा करखेली, महाराष्ट्र बँक धर्माबाद,शाखा धर्माबाद,शाखा करखेली,महाराष्ट्र बँक धर्माबाद व शाखा धर्माबाद बँक ऑफ बडोदा, करखेली शाखा ,इत्यादी बँकेच्या माध्यमातून 52 गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची जबाबदारी देण्यात आली तालुक्यात उपरोक्त बँकेच्या वतीने प्रत्येक शाखेतील काही खातेदारांचे त्यांच्या कर्जमाफी योजनेत समावेश झाल्याचा मेसेज आला पण प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली नाही किंवा नव्याने पीक कर्ज मिळाले नाही योजना सुरू होऊन देखील पाच वर्ष संपले तरी कर्जमाफीचा लाभ मिळत नसेल तर नेमक्या अडचणी काय ? हे तरी कळवा व मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे आता राज्यातील सरकारमध्ये बदल झाला असून पूर्वीच्या सरकारने जाहीर केलेल्या या कर्जमाफी योजनेचा लाभ पाच वर्षापासून अनेक लाभार्थ्यांना मिळालाच नाही.  

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळेल का ? सदरील शेतकरी उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित राहिले तर दोष कुणाचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आज घडीला राहिलेला आहे तालुक्यातील कुटुंब प्रमुख असलेल्या शेतकऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा कडून मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली मात्र अशा या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही तसेच नव्याने पीक कर्ज मिळाले नाही यात नेमकी अडचण काय याची सहानिशा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देत नवीन पीक कर्ज वाटपाचे काम त्वरित करावे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांचे वारसदार यानी तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालय व पोलीस स्टेशन व निबंध कार्यालय व तालुका कृषी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते व उपोषण देखील तहसील कार्यालय येथे नागनाथ पाटील माळगे यानी आमरण उपोषण केले होते.पण आमरण उपोषण बसल्यानंतर तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यात येईल असा पत्र दिल्यानंतर उपोषण उठवण्यात आले पण अद्याप पाच वर्ष होत आहेत तरी पण मयत शेतकऱ्यांच्या वारसांना नवीन पीक कर्ज मिळाले नाही व त्यांना न्याय मिळाला नाही तरी गतिमान शासनाने लवकरात लवकर मयत शेतकऱ्यांचे 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये मयत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज व माजी नरसेवक संजय पवार व नागनाथ पाटील मालगे व पांडुरंग पाटील जगदंबे यांच्याकडून निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे मागणी केली आहे

 मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या शासनाने खात्यामध्ये मात्र अद्यापही रक्कम शासनाने जमा न केल्यामुळे जमा न झाल्याने मयत शेतकऱ्यांचे वारसदार आर्थिक दृष्ट्या हैराण झाले आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने घोषणा करून देखील पाच वर्षे उलटले तरी नवीन सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून मयत शेतकऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा.धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांचे 2019 मध्ये शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये कर्ज माफ केले होते पण अद्याप शासनाने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न केल्यामुळे जशास तसे त्यांचे कर्ज दाखवत असल्यामुळे त्यांना नवीन पीक कर्ज मिळत नाही तरी शासनाने लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे व नवीन पीक कर्ज मिळवून द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी व माजी नगसेवक संजय पवार व नागनाथ पाटिल मालगे व पांडुरंग पाटील जगदंबे आदि धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसाना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!