नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – राष्ट्रीय महामार्ग नांदेड विभाग येथे कार्यरत असलेले सागर तायडे कार्यकारी अभियंता यांनी दिनांक 1/8/2024 रात्री उशिरा पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 387 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हातील आरोपी अद्याप फरार असलेबाबत माहिती समोर आलेली आहे.
पाच लाख रुपये दे नाहीतर नांदेडमध्ये तुला जीवाने ठार मारून टाकतो तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी धमकावून शासकीय अधिकाऱ्यास खंडणीची मागणी केलेली आहे.
सदरील सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाल्यामुळे सबळ पुराव्यासह गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.गत पाच ते सहा महिन्यांपासून सदर ब्लॅकमेलिंग सतत चालू असल्या बाबत माहिती समोर येत आहे.
आरोपींची नावे खालील प्रमाणे 1) सुजाता माधव ढोले 2) माधव ढोले 3) अशोक भोसीकर. शासनातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी प्रचंड मानसिक त्रास सहन करून शेवटी या रॅकेट ला कायदेशीर रित्या धडा शिकवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी असून यामुळे या रॅकेट नी अजून किती लोकांना ब्लॅकमील करून लुबाडले आहे त्या सर्वांच्या प्रकरणाला वाचा फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याचे व अभियत्याच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असलेबाबत चर्चा आहे.