नांदेड महापालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

“महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान अभियान राबविण्यात येणार”

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचपार्श्वभुमीवर मागील दोन वर्षापासुन राज्यात “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत असुन सदरील अभियान यावर्षी सुद्धा दिनांक ०९ ते १५ ऑगस्ट या दरम्यान राबविले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत उद्या दिनांक ०९.०८.२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता हडको बस स्टॉप पासुन महापालिकेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील तिरंगा रॅली हडको बस स्टॉप पासुन सुरुवात होऊन सिडको पाण्याची टाकी मार्गे ढवळे कॉर्नर-दुध डेअरी मार्गे नावघाट पुल ते डॉ.सावरीकर हॉस्पीटल ते बर्की चौक मार्गे जुना मोंढा टॉवर पासुन देना बैंक-महाविर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक मार्गे कलामंदिर ते शिवाजी नगर मार्गे आय.टी.आय.चौक ते व्ही.आय.पी.रोड मार्गे अण्णा भाऊ साठे चौक ते वसंतराव नाईक चौक नार्गार्जुना हॉटेल ते आनंद नगर मार्गे वर्कशॉप कॉर्नर ते राज कॉर्नर मार्गे शेतकरी चौक तरोडा नाका ते कॅनॉल रोड चौक मार्गे साईबाबा मंदिर तरोडा (बु) येथे या रॅलीचा समारोप होणार आहे.

तरी नांदेड शहरातील सर्व नागरीकांनी,विद्यार्थ्यांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी इत्यादींनी या तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

अशी माहिती जनसंपर्क विभाग,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!