हिमायतनगर/ प्रतिनिधी.
हिमायतनगर – नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या गावातील नागरिकांना अशुद्ध नदीचे पाणी पिऊन जिवन जगव लागतं,सन 2015/16/17 वर्षी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे कामं देखील करण्यात आले होते.परंतु गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांनी थातुरमातुर काम करुन दिघी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आज घडीला नदीचे दुशीत पाणी पिण्याची वेळ संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांनी या नागरिकांवर आणली आहे,सदरील पाणी पुरवठा विभागाने करण्यात आलेल्या काम सुरळीत करण्यात यावे किंवा दिघी गावाला भरघोस निधी मंजूर करुन देऊन पुन्हा एकदा टिकाऊ कामं करून सुरळीत गावातील नागरिकांना पाणी मिळुन द्यावे या मागणीसाठी दिघी येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व राजुभाऊ गायकवाड यांनी दिनांक 8/08/2024 गुरुवार रोजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या कार्यालय मंत्रालय मुंबई येथे निवेदन देऊन सादर केले आहे.
दिघी येथील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळुन देण्यासाठी पाठपुरावा करतीच राहणार असल्याचे राजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे.