महिला व बाल विकास समिती, युनिसेफ आणि एसबीसी 3 अंतर्गत बालविवाह निर्मूलन प्रतिबंध *पालक जागरूकता व विद्यार्थी सक्षमीकरण मार्गदर्शन संपन्न 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे.

नांदेड – महिला व बाल विकास समिती व युनिसेफ आणि एस बी सी 3 अंतर्गत बालविवाह निर्मूलन प्रतिबंध व पालक जागरूकता आणि विद्यार्थी सक्षमीकरण या विषयावर दिनांक 06/08/2024 ला स्वयंसेविका सौ .संगीता लालबा वाघमारे यांचे मार्गदर्शन झाले आहे.. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री गोडाजी सर, प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री तोटरे साहेब, केंद्रप्रमुख श्री किशवे सर,श्री कळस्कर सर,व श्री 

कलेटवार सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ रजनीका श्यामसुंदर सुरावर,उपाध्यक्ष श्री शेख सद्दाम पाशा व सर्व सदस्य, पालक वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिक.

 

 सौ.संगीता लालबा वाघमारे यांनी मुला मुलींना खेळाच्या व गप्पागोष्टी च्या माध्यमातून मुला मुलींमध्ये समानता कशी आणता येईल समजावून सांगितले व पालकांना या संदर्भात जाणिकपूर्व लक्ष देऊन यापुढे बालविवाह थांबवावे. मुलींना समाजात वावरताना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड देण्यासाठी पालकांनी पूरक लक्ष देऊन मुलीचे प्रत्येक क्षेत्रात पुढे करून देश पातळीवर सेवा करण्याचे योगदान देता येईल अशा प्रकारच्या मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. जडलावार सरिता मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री. तुमेदवार सर यांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!