ओबीसी आरक्षण बचाव मेळावा प्रा.लक्ष्मण हाके यांच्या भोकर येथील सभेला ओबीसी एससी एसटी समाजाने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे – ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जेरगेवाड यांचे आवाहन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

प्रतिनिधी/ माधव काईतवाड

हिमायतनगर:-महाराष्ट्र ओबीसी आरक्षण बचाव अभियानाचे संघर्ष योद्धा प्रा. लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आरक्षण बचाव मेळावा येत्या दिं.१८ऑगस्ट २४ रोजी दुपारी ११:०० वाजता भोकर येथे मोढा परिसरात संपन्न होणार असल्याने हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सकलओबीसी, एससी एसटी बांधवानी सर्व कामे बाजूला ठेवुन,उपस्थित राहावे.तसेच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्व ओबीसी, एससी एसटी कर्मचारी बांधवांनी मेळावा सभेला आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान नाना गुडेटवार, बालाजी खरडे, बाबाराव जरगेवाड,दिलीप राठोड,राजेश फुलारी, डाॅ.दामोधर राठोड, श्याम ढगे, गजानन जिद्देवार,दिलिप शिंदे, साहेबराव चव्हाण, आनंद मुतनेपाड,नागेश शिंदे,राम जा़धव, आदिने केले आहे.सद्या ओबीसीमध्ये चारशेच्यावर जाती असुन साठ ते सतर भटक्या जनजाती असल्याने त्याना घर,निवारा,राशन कार्ड, आधार कार्ड ही त्यांच्या नावावर नाही.तर भटके असल्याने अनेक कुटुंबे आज ही पालातच राहतात. ओबीसी तीलअनेक जातीच्या मुलांमुलींना शाळा माहीत नाही.पिचलेला,गरीब, शोषीत,पिढीत,मोलमजुरी करणार्‍यां समाजाला भारतीय संविधानाने ओबीसी आरक्षण दिले ते कायम रहावे.ओबीसीच्या हक्काचे आरक्षण कोणी ही हिरावून घेतले जाऊ नये. मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देवू नये. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. अशी सकल ओबीसी समाजाची एकमुखी मागणी आहे. त्यासाठीच संविधानाचे अभ्यासक,मागासवर्गीयआयोगाचे सदस्य,ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचे योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांचे अभ्यासपूर्ण क्रांतीकारी विचार ऐकण्यासाठी व ओबीसीचा पुढील लढा अधिक तीव्र करण्यासाठी भोकर येथील मेळाव्यास हजारोच्या संख्येने युवक,ज्येष्ठांनी,महिलांनी,युवतींनी, सेवानिवृत्त कर्मचारी,कर्मचारी बांधवानी उपस्थित रहावे असे आव्हान बालाजी खर्डे पाटील यांनी केले आहे. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातुन एकुण दोनशे गाड्याचा ताफा भोकरला जाणार असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share This Article
error: Content is protected !!