मुदखेड प्रतिनिधी राहुल कोलते
मुदखेड – भीम आर्मी एकता मिशन यांच्या वतीने भारत बंद व आंदोलने करण्यात आले नांदेड जिल्ह्या अधिकारी कार्यालय नांदेड येथे भीम आर्मीचे धरणे आंदोलन करण्यात आले, सुप्रीम कोर्टाने SC.ST. मागासवर्गीय मागासअसलेल्या प्रवर्गाला मूळ प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानात तरतूद करून त्यांना आरक्षण दिले होते परंतु त्या दिलेल्या आरक्षणाला व संविधानाला छेडछाड करू आरक्षण वर्गीकरण करून मागासवर्गीय समाजावर अन्यायकारक निर्णय दिला हा निर्णय चुकीचा दिला असून त्या अनुषंगाने भीम आर्मी भारत एकता मिशन नांदेड जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भीम आर्मी जिल्हा सहसचिव मा. श्रीकांत वाघमारे, धर्माबाद तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, धर्माबाद तालुका उपाध्यक्ष कुलदीप मस्के, धर्माबाद तालुका सचिव बाबासाहेब डोंगरे, धर्माबाद शहर अध्यक्ष बुद्धिवंत लोखंडे, आणि धर्माबाद शहरातील भीम आर्मी सदस्य साहेबराव सोनकांबळे, संदीप मस्के गौतम वाघमारे, मारुती वाघमारे, किरण हनुमंते, सुबोध चौदंते, कीर्ती राज सिद्धार्थ मार्गदर्शक शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या. 1)अनुसूचित जाती जमाती आणि मागास असलेल्या प्रवर्गाला आरक्षण कोट्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे 2) खाजगी संस्थांमध्ये आरक्षण व्यवस्था लागू करावी 3) जोपर्यंत एस .सी. एस .टी. ओ.बी.सी. चा कोठा भरला जाणार नाही तोपर्यंत संविधाना मध्ये कसलाही प्रकारचा बदल करता कामा नये करू नये, ह्या मागण्याचे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.