नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – मुदखेड मौजे पिंपळकौठा चोर येथील अण्णा भाऊ साठे नगर नवी आबादी येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 104 व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेयांच्या प्रतिमाना पुष्प माल्या अर्पण करून लाल निषाण ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, तद नंतर या कार्यक्रमाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले, यावेळी बोलतांना खा. अशोक चव्हाण म्हणाले की,समाजातील विषमता संपविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी दलित, पीडित, शोषितांच्या व्यथा आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडल्या आणि खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने साहित्याची निर्मिती केली. हे अण्णाभाऊंचे साहित्य शोषित, पीडिताचा आवाज बनवून साता समुद्रापारही उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या लेखणीचा संदेश समाजाने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एकोप्याने राहून हक्का साठी जागृत राहून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना पदरात पाडून घेतल्या पाहिजे, मातंग समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टिची स्थापना सद्याच्या शासनाने करून दिली आहे. त्यामुळे समाजात शिकणारा वर्ग तयार झाला तर अण्णाभाऊ साठे शिक्षण व प्रशिक्षण संस्थे मार्फत मोठ मोठ्या सरकारी हुद्यावर आपला समाज पोहचू शकतो, यासाठी काही मदत लागलीच तर मी आपल्या साठी सदैव तयार असल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी खा. अशोक चव्हाण, प्रवीण गायकवाड,शंकर मुतकलवाड,बालाजी पाटील खटिंग, सुदाम पाटील खानसोळे,गुलाब सूर्यवंशी,भीमराव पाटील कल्याने,रत्नाकर पाटील शिंदे,बाळासाहेब देशमुख बाराडकर,शंकर पवार उत्तम चव्हाण,विजय सूर्यवंशी,साहेबराव मोरे, संतोष पाटील गाढे, सुधाकर देशमुख, चंद्रकांत हनुमंते, मारुती किरकण,रामशिंग चव्हाण, मारोती पाटील जाधव, धुरपता कांबळे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद मस्के, साहेबराव गोरखवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप वाघमारे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर सरपंच सत्वशीला माधव वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प माल्या व शाल देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रल्हाद मस्के यांनी मानले, अण्णा भाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित शाहिरीचा जलसा होऊन भोजन दा न व ढोल ताशाच्या निनादात अण्णाभाऊच्या तैल चित्राची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.