जाहुर ग्रामपंचायत च्या गैरकारभाराची चौकशी करा…ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील मुखेड तालुक्या मधील मौजे जाहुर ग्रामपंचायत ने २६ जानेवारी नंतर अद्याप पर्यंत ग्रामसभा घेतली नसून दि.१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी ग्राम पंचायती ने ग्रामसभा घेतली परंतु त्या ग्रामसभेला सरपंच,ग्रामविकास अधिकारी, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती.

 तरी ही ग्रामसभा सरपंच प्रतिनिधी,लिपीक,रोजगार सेवक सह मुख्याध्यापक मोरे या चार ते पाच व्यक्तींच्या उपस्थितीनेच पार पडली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले.गावात अनेक समस्या व विकास कामे प्रलंबित असल्याने गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत बद्दल असंतोष पसरला असून जाहूर ग्रामपंचायतच्या गैरकारभाराला व एकाधिकारशाहीला ग्रामस्थ चांगलेच कंटाळले असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये हर घर नळ योजना या जल जीवन मिशन योजनेचा ग्रामस्थांना सुलभरीत्या लाभ मिळावा यासाठी शासनाने ही योजना अमलात आणली परंतु जाहुर ग्रा.पं.या जल जीवन योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार केला असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगण्यात येते. त्याचबरोबर ग्रामपंचायतिने गावकऱ्यांसाठी एक वेगळा नियम बनवला असल्याचेही समजते,म्हणजे ग्रामस्थांना जर नळ कनेक्शन घ्यावयाचे झाल्यास ११०० रु. ची मागणीही सरपंच प्रतिनीधी कडून केल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गावातील मागासवर्गीय वस्तीतील अंगणवाडी येथे काही कामगार लोकांना राहण्याची व्यवस्था केली असून त्या लोकांनी त्या परिसरात मद्यपान करून दारुच्या बाटल्या परीसरात टाकल्याने परिसर दुर्गंधीयुक्त झाल्याचेही सांगण्यात आले. गावातील विविध समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

जाहुर ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी संदर्भात ठराव पास न केल्यामुळे अनेक लाभार्थी घरकुल योजने च्या लाभापासून वंचित असल्याचं गावातील सामाजिक कार्यकर्ते हणमंत वाघमारे,शिवाजी घाटे, प्रकाश हिवराळे ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहुर ग्राम पंचायती च्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय मुखेड यांच्याकडे दि.२३ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करीत तत्काळ ग्राम पंचायती ने गावातील विविध समस्यांकडे लक्ष देवून दलित वस्तीतील कामे करावेत अन्यथा पं.स.कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते हणमंत वाघमारे व शिवाजी घाटे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

Share This Article
error: Content is protected !!