काही तासांच्या आतच कुंडलवाडी पोलीसांनी आरोपीला पकडून ठोकल्या बेड्या…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्या मधील कुंडलवाडी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेळगाव (थडी) येथील महिलेला मागील चार महिन्यापासून माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवू दे म्हणत तिच्याशी नेहेमीच जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान आरोपीने महिला एकटीच घरी असल्याचे पाहून आरोपीने विवाहित महिलेस जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.यास महिलेने नकार दिला असता महिलेस आपल्या पॅन्टच्या खिशातून विषारी औषधाची बॉटल काढून महिलेच्या तोंडात ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धर्माबाद तालुक्यातील शेळगाव (थडी) येथे दि.२० ऑगस्ट रोजी भरदिवसा दुपारी ३:०० वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपीस १२ तासांत कुंडलवाडी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
शेळगाव येथील एका २५ वर्षीय महिलेस मागील ४ महिन्यांपासून आरोपीने शारीरिक संबंध ठेवू दे,असे म्हणत नेहमी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.यातच २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्या घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.पीडित महिलेने शारीरिक संबंधास नकार दिला असता आरोपीने पीडित महिलेच्या छातीवर बसून त्याने त्याच्या खिशातून विषारी औषधाची बाटली काढून तोंडात बाटलीतील औषध ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकारणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुरनं. १३७/२०२४कलम १०९, ७४,७८,३३३,६४,५२,भारतीय न्यायसंहिता २०२३अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के हे करीत आहेत आरोपी अंकुश तुकाराम मामडे रा शेळगाव थडी यास घटनेच्या काही तासातच अटक केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी घटना स्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.