नायगाव प्रतिनिधीअशोक वाघमारे
नायगाव – कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांच्या आशिर्वादाने अनेक ठिकाणी देशी विदेशी दारू अवैध विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. संबंधित पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून जोर धरत आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील कुंटूर फाटा, अंतरंगाव, रुई बुद्रुक, व कुंटूर फाट्या जवळ बच्चेवार यांच्या पेट्रोल पंपासमोरील अंबिका हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूची चढ्या भावाने विक्री होत आहे. अवैध देशी, विदेशी दारूचे बॉक्स ठेवून विकत असल्याने दारुमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. हि दारू पिऊन काहीजण पत्नी व मुलांना मारहाण करत आहेत तर काही जण गावात , भर रस्त्यात धिंगाणा घालत आहेत. दारू कुठे व कशी मिळते हे गावातील महिला व लहान मुलांनाही माहिती आहे मात्र पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कसे दिसत नाही. हा अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा अर्थपूर्ण संबंधामुळे राजरोस चालू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
अवैध दारू अनेक गावांमध्ये किराणा दुकानात हॉटेलमध्ये पान टपरीवर मिळत आहे. मात्र या बाबींकडे बिलोलीचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, ठाणे प्रमुख व बीट जमादार यांचे याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी लक्ष घालावे अशी मागणी महीला व सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.