नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्यात कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय.बिलोली तहसिल कार्यालयातील गौण खनिज विभागातून मुरूम माफियांना मोठे पाठबळ मिळत असल्याचं सर्वज्ञात आहे.सातबारा,वाहनाचे क्रमांक, वाहतूक स्थळ हे सर्व नियोजितपणे पुरवण्याचे काम* महसुल कारकून पार पाडत आहे.
कारकुनाच्या अनेक तक्रारी असतानासुद्धा “खुर्ची व सगळ्यांची मर्जी” सांभाळत आहे.विभागातूनच माफियांना पाहिजे तशी मदत मिळत असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे.
नाममात्र ब्रास मुरूम परवाना काढून हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन करण्याचा प्रकार बिलोली तालुक्यात सुरू आहे. अर्जापूर ता.बिलोली येथे असा प्रकार सुरू आहे.येथील अवैध मुरूम उत्खननाची इटीएस मोजणी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी केली आहे.
बिलोली तालुक्यामध्ये अवैध मुरूम माफियानी उच्छाद मांडला आहे.महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नाममात्र ब्रास मुरूम परवाना काढून हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन करण्याचा फंडा वापरला जात आहे.काल्पनिक शासकीय रस्त्याच्या नावाखाली परवाना काढून खाजगी व्यावसायिकांना विक्री करण्यात येत आहे.
अर्जापुर ता.बिलोली येथील गट नंबर ३३७ मधुन केटीआयएल कंपनी च्या कामासाठी दिवसरात्र लाखों ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आले.या मुरूम उत्खननाची इटीएस मोजणी करण्याची मागणी करण्यात आली.मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच गट नंबर ३३६ मधून नाममात्र ब्रास मुरूम परवानाच्या नावाखाली हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन करण्यात आले.
या दोन्हीही गट नंबर मधील मुरूम उत्खननाची इ टी एस मोजणी करण्याची व मोजणी होईपर्यंत मुरूम उत्खनन परवाना न देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी प्रभारी तहसीलदार बालाजी मिठेवाड यांना दिलेल्या तक्रारीमध्ये केली आहे.