जबरी चोरी,मोक्यातील व मोटारसायकल चोरी करणारे 14 आरोपींना स्थागुशाने केली अटक

abhishek bakkewad
7 Min Read
Spread the love

08 मोटार सायकल, 02 अग्रीशस्त्र व नगदी 1,25,000/- रुपये असे एकुण 5,95,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : दि.22.जिल्यातील किनवट येथे कंदोरी करत असलेल्या इसमांना शस्त्राचा धाक दाखवुन जवरी चोरी करणारे,मोक्कयामधील फरार असणारे व शहरातील मोटार सायकल चोरी करणारे एकुण 14 आरोपी, 08 मोटार सायकल, 02 अग्रीशस्त्र व नगदी 1,25,000/- रुपये असे एकुण 5,95,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने जबरदस्त कार्यवाही केली आहे.या कार्यवाही नंतर सर्व स्तरांतून पोलिसांचं अभिनंदन केले जाते आहे.

दिनांक 18/07/2023 रोजी पोलीस ठाणे किनवट हद्यीमध्ये कंदोरी करत असलेल्या काही इसमांना अज्ञात चोरटयांनी शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी केली होती. सदर प्रकरणात पोलीस ठाणे किनवट गुरनं. 184 / 2023 कलम 392,342,34 भा. दं. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर प्रकरणातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबतचे सुचना मा.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक,नांदेड यांनी पोलीस निरीक्षक,स्था.गु.शा. नांदेड यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा,नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 21/07/2023 रोजी पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की,पोलीस ठाणे किनवट हद्यीमध्ये जबरी चोरी करणारे आरोपी पैकी काही आरोपी इतवारा,नांदेड परीसरात असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन वरीष्ठांचे आदेशाने स्वत: पुढाकार घेवुन स्थागुशाचे वेगवेगळया तिन टिम तयार करुन एक टिम संघर्ष नगर,इतवारा नांदेड येथे दुसरी टिम खडकपुरा, नांदेड व तिसरी टिम गुरुव्दारा परीसरात रवाना करुन तिनही ठिकाणहुन आरोपी नामे 1) सय्यद इम्रान सयद इसाक वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. धनेगाव नांदेड ह मु.खडकपुरा, नांदेड 2 ) विकास चंद्रकांत कांबळे वय 20 वर्ष रा.पळसा ता हदगाव जि नांदेड ह. मु.धनेगाव नांदेड 3) मुकेश ऊर्फ एम.जे.पि. चंदन जोगदंड वय 23 वर्ष रा. संघसेननगर,इतवारा नांदेड 4) चंद्रशेखर ऊर्फ चंद्र पि देवराव पाईकराव वय 23 वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड 5) प्रशिक ऊर्फ परश्या ऊर्फ रॉनी पि. दिलीप ओढणे वय 24 वर्ष रा. संघसेननगर,इतवारा नांदेड 6 ) ज्ञानेश्वर ऊर्फ डॅनी पि.अनिरुद्र गाडगे वय 22 वर्ष रा.सेलगाव ता अर्धापुर जि नांदेड 7) सयद सोहेल पि सयद नुर वय 21 वर्ष रा.खुदबेईनगर चौरस्ता नांदेड 8) शेख मुवीन शेख गौस वय 21 वर्ष रा खुदबेई नगर चौरस्ता,नांदेड 9) वैभव शिवराम गुरव वय 22 वर्ष रा.व्यंकटेश नगर,अंशुमनसिंघ राजेंद्रसिंघ मिलवाले वय 18 वर्ष रा.गुरुव्दारा गेट नंबर 5 नांदेड 11 ) सिताराम उत्तम काळे वय 25 वर्ष रा.पळसा ता.हदगाव जि. नांदेड 12 ) एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन पो. स्टे.किनवट हद्दीतील जबरी चोरी बाबत विचारपुस करता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन नांदेड 10) 2
त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले 02 पिस्टल (अग्नीशस्त्र), 01 जिवंत काडतुस, 01 एअरगण, 01 तलवार, 02 खंजर, 03 मोटार सायकल व गुन्हयातील जबरी चोरी केलेले नगदी 1,25,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे.नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पो स्टे किनवट येथे तपासकामी देण्यात आले आहे.

पो.स्टे.मुखेड

दिनांक 01/06/2023 रोजी मौजे चांडोळा ता मुखेड येथे काही आरोपीतांनी एका इसमास आडवुन जबरी चोरी केली होती.
त्यावरुन पोलीस ठाणे मुखेड गुरनं. 171/2023 कलम 395,120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा नोंद होता.नमुद गुन्हा हा वरील आरोपी पैकी आरोपी क्रं. 3,4,5,6 यांनी केला असुन ते गुन्हा केल्यापासुन फरार होते ते आज रोजी मिळुन आले आहेत.

( पो. स्टे. नांदेड ग्रामीण व इतवारा ) वरील आरोपी पैकी आरोपी क्र.2 हा पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं.122/ 2023 कलम 302,386, 120 (ब), भा द वि सहकलम मोक्का या गुन्हयातील फरार आरोपी आहे. तसेच पो स्टे इतवारा गुरनं. 12/ 2023 कलम 307,120 (ब), 34 भा द वि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम या गुन्हयातील फरार आरोपी आहे.

मोटार सायकल चोरी

नमुद आरोपीचे चौकशी दरम्यान स्था.गु.शा.चे पथकास नांदेड शहरातील मोटार सायकल चोरीचे आरोपीबाबत माहीती मिळाल्याने स्था.गु.शा.चे पथकाने आरोपी नामे 1) शेख सुफीयान शेख शकील वय 18 वर्ष रा. खुदबेनगर,इतवारा नांदेड 2 ) शेख अब्दुल रहेमान पि शेख चाँद पाशा वय 18 वर्ष रा.इतवारा नांदेड 3) शेख अमेर शेख शबीर वय 18 वर्ष रा इतवारा नांदेड यांना विचारपुस करुन त्यांचेकडुन पो स्टे शिवाजीनगर गुरनं. 226/2023 कलम 379 भा द वि पो स्टे नांदेड ग्रामीण गुरनं. 535/2023 कलम 379 भा द वि पो स्टे पुर्णा गुरनं. 155/2023 कलम 379 भा द वि पो स्टे मुदखेड गुरनं.144 / 2023 कलम 379 भा द वि पो स्टे भाग्यनगर गुरनं. 271 / 2023 कलम 379 भा.द.वि गुन्हयातील 05 मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.नमुद आरोपीतांना पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

(पो. स्टे भाग्यनगर )

दिनांक 20/07/2023 रोजी रात्री 8.30 वाजताचे सुमारास जखमी इसम नामे त्रिशरण पि. कैलास थोरात वय 37 वर्ष रा चिखली खुर्द ता.जि नांदेड यास आरोपी नामे 1) सुरज संजय बसवंते रा पांडुरंगनगर,नांदेड 2) आकाश भागोराव रणमले वय 20 वर्ष रा.पांडुरंगनगर,नांदेड 3) विनय राम जाधव वय 19 वर्ष रा. नमस्कार चौक नांदेड यांनी मारहाण केल्यामुळे डाव्या हाताचा मनगटापासुन तुकडा पडला होता.नांदेड पोलीसांनी तत्परतेने पोलीस व्हॅन मध्ये घेवुन दवाखान्यात भरती केले होते. पोलीस अधीक्षक,नांदेड यांनी

वैद्यकीय अधिकारी यांना उपचाराबाबत बोलले होते.नमुद जखमीचे हात वैद्यकीय अधिकारी यांनी बर्फात ठेवुन हातावर शस्त्रक्रिया करुन जोडलेला असुन सदर इसमांचा हात सध्या काम करीत आहे.नमुद गुन्हयातील आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

स्थागुशा, नांदेड कडुन 02 पिस्टल (अग्नीशस्त) 01 जिवंत काडतुस, 01 एअरगण, 01 तलवार, 02 खंजर, 08 मोटार सायकल व नगदी 1,25,000/- रुपये असा एकुण 5,95,000/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधीक्षक,नांदेड,मा.श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक,नांदेड,मा.श्री खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर,पो. नि.स्थागूशा नांदेड,सपोनि / पांडुरंग माने,पोउपनि / दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे,अशिष बोराटे,जसवंतसिंघ शाहु माधव केंद्रे,गंगाधर कदम,मोतीराम पवार,गणेश धुमाळ,विलास कदम,रणधिर राजबंशी,विठ्ठल शेळके,हेमंत बिचकेवार,शंकर केंद्रे,राठोड,सुरेश घुगे,संग्राम केंद्रे,संजीव जिंकलवाड, बालाजी तेलंग,किशन मुळे, दिपक पवार सायबर सेल येथील पोउपनि / गजाजन दळवी,राजु सिटीकर,दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. स्था. गु. शा. चे अधिकारी व अमंलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे

Share This Article
error: Content is protected !!