जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड :- किशनराव गायकवाड कुदळेकर हे १९९७-९८ पासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन पक्षश्रेष्ठींने आता पर्यंत जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पडत्या काळापासून पार पाडत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात व देशात पक्षाचे सरकार नसताना सुद्धा तळागाळातील लोकांपर्यंत भाजपा वाढविण्यासाठी जिवाचे रान करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधीची दुश्मनी पत्त्कारून पक्ष संघटना मजबूत केलेली आहे. तर किशनराव गायकवाड यांनी २००० साली जिल्हा कार्यकारिणी सदस्य, २००५ मध्ये उमरी तालुका अध्यक्ष, २०११ मध्ये जिल्हा चिटणीस, १०१९ मध्ये जिल्हा उपाध्यक्ष व सद्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य महाराष्ट्र प्रदेश या पदावर कार्यरत असुन कसलीही अपेक्षा न करता निस्वार्थ पणे पक्षाचे विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकीतील उमेदवाराचा प्रचार करतात पक्षाच्या प्रत्येक आंदोलन व बैठकात सहभागी होऊन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत १९९२ साली ईज्जतगाव आताचे तळेगाव जिल्हा परिषद अनुसूचित जाती राखीव गटातुन (शिवसेना),१९९५ मध्ये तत्कालीन १७२ भोकर विधानसभा मतदारसंघातून ( अपक्ष), २००२ मध्ये प. स. तळेगाव अनुसूचित जाती राखीव गणातुन (भाजपा) तर २००७ मध्ये जिल्हा परिषद तळेगाव अनुसूचित जाती महीला राखीव गटातुन पत्नीने (भाजपा) इत्यादी ठिकाणी निवडणूका लढविलेल्या असुन पक्षाचे कार्यकर्ते टिकुन ठेवलेला आहे.
गायकवाड यांना सामाजकारण व राजकारणाचा चांगला अनुभव आहे. पक्षश्रेष्ठींने आतापर्यंतच्या कार्याचा विचार करून ९० देगलुर -बिलोली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने किशनराव गायकवाड यांना उमेदवारी दिली तर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींने विचार केला तर भारतीय जनता पार्टीचा यावेळी आमदार होऊ शकतो अशी देगलुर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक जनतेत जोरदार चर्चा आहे. अशी माहिती भाजपा चे सक्रिय कार्यकर्तै रविंद्र गायकवाड कुदळेकर यांनी माहिती दिली आहे