मनपा आयुक्तांनी दिल्या पुरग्रस्त भागांना भेटी; मागील दोन दिवसात महपालिकने केले ११४६ पुरग्रस्तांचे स्थलांतर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – नांदेड शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजिवन विस्कळीत झाले असुन नागरीकांच्या मदतीला मनपा प्रशासन धावुन जाऊन मागील दोन दिवसापासुन मतदकार्य करीत आहे. याच पार्श्वभुमीवर *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी दिनांक ०३.०९.२०२४ रोजी शहरातील सखल भागातील विविध पुरग्रस्त भागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली आहे.

यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरीकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारण केंद्रास भेट देऊन नागरीकांची विचारपुस केली. मागील दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकुण ११४६ नागरीकांना स्थलांतरीत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरीकांसाठी महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी इत्यादी जिवणावश्यक वस्तु पुरविण्यात येत असुन सदरील ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्रास भेट देऊन घेतला आहे.

यादरम्यान मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे बोटीचा वापर करुन पुरजण्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या खडकपुरा (समीराबाग) भागातील ३२ नागरीकांना, लिंगायत स्माशानभुमी जवळील उर्वशी मंदिराजवळ ५ नागरीकांना तर गायत्री मंदिर पांडे गल्ली भागातुन १६ नागरीकांना सुखरुप बाहेर काढुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

या भेटीदरम्यान पुरग्रस्त भागातील नागरीकांची विचारपुस करुन महापालिका प्रशासन आपणास हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन मनपा आयुक्तांनी नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी नागरीकांनी शहरात उदभवलेल्या पुरजन्य परिस्थितीत घाबरुन न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!