नांदेड प्रतिनिधी/राहुल कोलते
नांदेड – दि 25 ऑगस्ट 2024 रोजी नायगांव तालुक्यातील सोमठान या गावी नायगांव मतदारसंघातील आमदार राजेश पवार यांनी दीक्षाभूमि नागपुर तीर्थयात्रा दर्शन सहल आयोजित केली होती त्यानिमित्याने सदरील गावामधे भव्य असे बैनर लावण्यात आले होते. पन त्या बैनर मधे विश्वाला शांतीचे संदेश देनारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवरती भाजप नेत्यांचे फोटो टाकून महापुरुषांचा अपमान केला आहे. ही घटना आमच्या निदर्शनास आल्यानंतर आयोजकाला व गावातील समाज बांधवाना कळविल्या मुले टेथील गावातील मंडळींनी ही चुक लक्ष्यात घेऊन सदरिल बॅनर काढून टाकले. पन हेच बॅनर आमदार राजेश पवार यांनी शोशल मीडिया वर (इंस्टाग्राम) वर पोस्ट केली आहे. तरी त्यांना समाजातील कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातुन सदरील पोस्ट डिलेट करावी म्हणुन वारंवार विनंती केली होती.तरी पन गेले आठ(8) दिवस झाले तरी आजूनही ही पोस्ट त्यांनी दिलेट केलेली नाही. हे सर्व पाहता हा गुन्हा जाणून केलेला आहे आणि जातीवरून हिणत्वाची भावना ठेवून पोस्ट करणे व नुसती बदनामी नाही तर शांतता भंगास उत्तेजना निर्माण करणे, धार्मिक भावना दुखविणाऱ्या हेतू पुरस्सर करणे आसे दिसून ऐत आहे की हे सर्व जानुन केलेले कट कारस्थान आहे असे स्पष्ट दिसुन येत आहे.
तरी श्री. मां .साहेबांनी ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई करावी अन्यथा भिम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या वतीने जिल्हा व राज्य भर आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिणचे स्वप्निल भोसीकर, भीम आर्मी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते, मनोज सोनकांबळे, हर्षवर्धन कांबळे, सतीश कांबळे, राजेश खंडेलोटे, मिलिंद सोनकांबळे, कुलदीप मस्के, सुमेध तुरे, सिद्धार्थ हनुमंते सत्यपाल सोनटक्के, बुद्धिवंत लोखंडे, संदीप लांडगे, श्रीकांत वाघमारे व इतर भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.