समाजाच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर व अग्रेसर आसणारे आपल्या सर्वांचे चाहते.
गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.भुमन्ना आक्केमवाड यांच्या कडून शुभेच्छा.
हिमायतनगर प्रतिनिधी/
हिमायतनगर – व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही श्री नारायण कोरेवाड हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत, आज श्री.नारायण काका यांचा वाढदिवस आहे, यांची आज एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही तर समाजकारणात अतीशय आवर्जून उल्लेख कार्य करतात आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.
निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच, वडगाव (ज) येथील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे , माननीय श्री नारायण कोरेवाड गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष हिमायतनगर यांच्या वाढदिवस श्री.साईप्रसादशेतकरी बचत गट तर्फे अतिशय उत्साही वातावरणात जन्म वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी श्री.विकास गोरे शेतकरी बचत गट अध्यक्ष,महेश ताडकुले,सचिन बिरकूरे, प्रदीप गोरे, कैलास बेळगे ,बालाजी बेळगे, रामचंद्र बिरकुरे,बालाजी कोरेवाड, गजानन खुणे,सुदर्शन भालेराव,दत्ता मुत्यलवाड, गणपत चव्हाण, शिवाजी कारलेवाड, साहेबराव दुगमवाड, गजानन ताडकुले, पांडूरंग गोरे, केशव पावडे,विलास ताडकुले गावातील सर्व जेष्ठ शेतकरी,व नागरिक उपस्थित होते.