नवसाला पावणारा पालखीचा मानाच्या गणरायाची सत्त्याहत्तर वर्षाची परंपरा असलेल्या “श्री” ची स्थापना…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे 

नायगाव – स्वातंत्र्य पूर्व काळापासून १९४७ पासून म्हणजेच मागील ७७ वर्षाची परंपरा असलेल्या पालखीचा मानाच्या ” गणराची स्थापना नायगाव येथे दुपारी करण्यात आली आहे. नायगाव येथे १९४७ साली सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परंपरा सुरु झाली ती आजतागायत कायम असून यंदा २०२४ च्या ‘श्री’ च्या स्थापनेचे ७७ वे वर्ष आहे.

 

मानाच्या ‘श्री’ च्या आकारा दिवसाच्या काळात येथे विविध उपक्रम होत असत आणि विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कालांतराने उपक्रम बंद झाले असले तरी महाप्रसादाची परंपरा मात्र आजही कायम असून. ‘श्री’ विसर्जनाच्या नंतर मोंढा परिसरात महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

नायगाव शहरात दरवर्षी २० ते २५ गणपतींची स्थापना होते. पण ‘श्री’ विसर्जनाच्या दिवशी मानाच्या गणपतीची मिरवणूक निघाल्यानंतरच अन्य गणपतीच्या विसर्जन मिरवणूका निघतात.

 

मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक टाळ, मृदंग वाजत आणि भजन करत पालखीतून निघते ज्या मार्गावरून हि मिरवणूक जाते त्या मार्गावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

 

अतिशय भक्तीभावाने मिरवणूक निघाल्यानंतर अगोदर मानाच्या गणपतीचे विसर्जन होते. मानाच्या गणपतीची ७७ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असल्याने आकारा दिवसाच्या काळात दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात.

Share This Article
error: Content is protected !!