नवी दिल्ली – केंद्र सरकारने वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. तसेच हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होईल, असेही सरकारने म्हटलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.