पाळज या गावात गत ७७ वर्षापासून गणपती उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थित साजरा होतो.
नांदेड जिल्ह्यात मोठे गणेश उत्सवाचे तीर्थक्षेत्र म्हणून पाळज या गावास ओळखले जाते.
भक्तांसाठी या अकरा दिवस चालणाऱ्या महोत्सवा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम…
भोकर ता. प्रतिनीधी/ सुभाष पाटील किनीकर
भोकर – भोकर तालुक्यातील पाळज या तीर्थक्षेत्रात गणेश महोत्सवास प्रारंभ झाला असून श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सकाळच्या राम प्रहारात पाच वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली.भावीक भक्तांसाठी या अकरा दिवस चालणाऱ्या महोत्सवा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासह परमपूज्य बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांचे नऊ दिवस दररोज शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सह अनेक कार्यक्रमाची भक्तीरस मेजवानी भक्तांसाठी मिळणार आहे.
भोकर तालुक्यातील पाळज हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर वसलेलं गाव. या गावात गत ७७ वर्षापासून गणपती उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थित साजरा होतो. येथे ‘श्री’ ची म्हणजे गणपतीचे भव्य मंदिर आहे. या भव्य ठिकाणी भक्तनिवास, सभामंडप, प्रसादालय आणि पाण्याची सोय असून या भव्य मंदिर परिसरातच ११ दिवस गणेश उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होतो. येथे दररोज सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी होते. या गणपती उत्सवात श्री च्या दर्शनासाठी महाराष्ट्र व तेलंगाना भागातून दररोज हजारो भाविक येतात. येथे स्वंयसेवक यांच्या नियंत्रणाखाली शिस्तीत व शांततेत दर्शन मिळते.
येथे दररोज ५० क्विंटल अन्नदान शिजवल्या जाते. ११ दिवस या गावाला भक्तांची मंदियाळी असते, जणू काही गावकऱ्यांसाठी हा गणेशोत्सव म्हणजे दिवाळी दसराच असतो. सध्या तरी नांदेड जिल्ह्यात मोठे गणेश उत्सवाचे तीर्थक्षेत्र म्हणून पाळज या गावास ओळखले जाते.सर्व जातीय पंथीय लोक येथे सेवा करतात. यंदा सन २०१४ या वर्षी पाळज गणेश मंदिर संस्थांच्या वतीने येथे विविध सांस्कृतिक व धार्मिक,भजन सहित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. येथील कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६.३० वा. आरती, सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ५ शिवपुराण कथा व सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ, सायंकाळी ६.३० वा. आरती, रात्री ८ ते ११ हरिकीर्तन व त्यानंतर जागर भजन आणि सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसादचा असा दिनचर्याचा कार्यक्रम आहे. दि. ७ सप्टेंबर रोजी जय हनुमान संगीत संच खांबाळा व शिवपार्वती संगीत संच वारकवाडी यांचा संगीत सामना, दि. ९ रोजी ह. भ. प. अंजलीदीदी केंद्रे यांचे कीर्तन, दि. १० रोजी साध्वी सोनालीदीदी करपे, ११ रोजी ह. भ. प. ज्योतीताई धनाडे, १२ रोजी ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज, १३ रोजी ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर, १४ रोजी ह.भ.प. विशाल महाराज खोले, १५ रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे सलग कीर्तन होणार असून दि.८ ते १६ सप्टेंबर दरम्यान बालयोगी गजेंद्र चैतन्य जी महाराज यांची दुपारी १ ते ४ या वेळात दररोज शिवमहापुराण कथा आयोजित केले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे पाळज येथील समस्त गावकरी मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
