जिल्हा प्रतिनिधी/प्रतिनिधी राहुल कोलते
नांदेड – नायगाव 5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, यानिमित्ताने ग्राम पंचायत कार्यालय हिप्परगा जा., शाळा व्यवस्थापन समिती व समस्त हिप्परगा तालुका नायगावच्या वतीने यावर्षी चा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री माधव नारायण वटपलवाड यांना देण्यात आला आहे. त्यांनी राबवलेल्या उल्लेखनीय कार्यक्रम व शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला.
या पुरस्काराची निवड ही विद्यार्थी, पालक व समस्त ग्रामस्थ यांनी मिळून करत असतात. यावेळी हिप्परगा जा. येथील सरपंच श्री संभाजी पवार, उपसरपंच श्री संतोष पाटील कदम,शा.व्य. स.चे अध्यक्ष श्री दत्तराम पाटील कदम, सदस्य श्री शिवाजी पा.कदम, श्री डी.जे.कदम,दत्ता पाटील कदम, ग्रामसेवक श्री जोंधळे साहेब,अंचोली शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम गायकवाड उपस्थित होते. अतिशय सुंदर सुत्रसंचलन श्री धम्मदीप गायकवाड सरांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दरबारे सरांनी केले. सहशिक्षक श्री रामदास शिंगेवाड सर,श्री शिवराज मोरे सर, श्री म्याकलोड सर व सौ.सविता शिंगडे मॅडम सह विद्यार्थी उपस्थित होते. हिप्परगा ग्रामस्थांनी केलेल्या या सन्मान सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.