तीन वर्षात नंतर हदगाव – हिमायतनगर तालुक्यात ७ हजार ४६३ घरकुलाना मंजुरी !

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा यशस्वी पाठपुरावा..

अभिषेक बकेवाड/

हिमायतनगर – हदगांव- हिमायतनगर तालुक्यात सन २०२१-२२ पासून कोणत्याही योजनेत घरकुल मंजूर होत नसल्याने मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल इतर मागास गोरगरीब जनतेला घरापासून वंचित राहावे लागले होते. या विषयात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड जिल्हा परिषदेसह केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हदगाव – हिमायतनगर तालुक्यात ७ हजार ४६३ घरकुलांना मंजुरी मिळवून देण्याचे काम पूर्ण केले आहे.

       खासदार म्हणून निवडून आल्यावर सर्वप्रथम खासदार नागेश पाटील यांनी नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला होता. या विषयावर खासदार आष्टीकर यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री व उपमहानिदेशक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांना हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर तालुक्यासह हिंगोली मतदार संघातील सर्वच तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा-२ मध्ये घरकुल योजनेतून मंजुरी बाबतीत पत्रव्यहार केला होता. त्याला आता यश आले असून प्रधानमंत्री आवास योजनेमधून हदगांव तालुक्यात एकूण ५ हजार २०५ घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे यात अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गसाठी ३ हजार २२६ तर इतर मागास व खुल्या वर्गासाठी १ हजार ९७८ घरकुलास मंजुरी मिळाली आहे.

Share This Article
error: Content is protected !!