उमरी तालुका प्रतिनिधी /उद्धव मामडे
उमरी :-पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदधिकारी यांच्या उपस्थित नुकतीच कै.गिरीशभाऊ गोरठेकर सभागृह येथे शांतता कमिटी बैठक पार पडली.यावेळी,पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंकुश माने साहेब यांनी मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाशी निगडित उपस्थितांना गणेशोत्सव साजरा करताना सर्व नियमांचे पालन करत साजरा करावा असे आवाहन केले.
महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीचे एक उदाहरण म्हणजे गणेशोत्सव जो संपूर्ण देशभर उत्साहात साजरा केला जातो.पण अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन केले जाते परिणाम अशा मंडळांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलीस प्रशासनामार्फत जागृती घडवून आणण्यासाठी पोलीस प्रशासन गणेशोत्सव मंडळाच्यात सलोखा निर्माण करुन जनसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही अशा पध्दतीने प्रशासकीय नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जातात गतवर्षीच्या गणेशोत्सवात प्रशासकीय नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात येते.
उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व पोलीस पाटील,यांच्या मिटींग मध्ये प्रशासकीय नियमांचे पालन करण्याविषयी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी माहिती दिली.१)एक गाव एक गणपती साठी गावातील पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे.२) सर्वांनी डॉल्बी मुक्त गणपती उत्सव साजरा करावा.३)पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा ४) पारंपारिक वाद्यांचा वापर करावा.नो डि.जे. ५)रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, समाज प्रबोधनात्मक नाटिका असे सामाजिक उपक्रम राबवावेत.गुलालाचा वापर करू नये फुलाची उधळण करावी६)गणेशोत्सव काळामध्ये ग्रुप डान्सच्या नावाखाली महिलांचे डान्स ठेवण्यात येऊ नयेत धार्मिक कार्यक्रम घ्यावे.७) मिरवणूक व्यसनमुक्त पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढावी.८) गणेश मूर्ती आकार लहान आकर्षक असावी.९) मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी रोज दिवसा रात्री 2 स्वयंसेवक हजर ठेवावे. १०)सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये. ११)मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी.१२)मिरवणूक मागे पुढे घेण्याच्या कारणावरून वाद विवाद करू नये.१३. गणेशोत्सव विसर्जन मार्गावर कृत्रिम तलाव असेल तिथे गणेश मूर्ती विसर्जन करण्यात याव्यात.१४) मा.उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिक्षेपकाचे,आवाजाचे, मानांकनाचे तंतोतंत पालन करावे, जी मंडळे ध्वनी प्रदूषण करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली.१५)मूर्ती ही मजबूत शाडुच्या मातीची असावी, पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यात यावी.१६)मूर्ती तयार करत असताना बंदीस्त ठिकाण असावे.वर्गणी गोळा रजिस्टर नोंद, पावती बुक असेल तर करावे दिल तेवढच वर्गणी घ्यावे,धार्मिक कार्यक्रम घ्यावेत,उघड्यावर मूर्ती बनवून ठेऊ नये,तसेच सर्व गणेश मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापना झाले पासून ते विसर्जन होईपर्यंत काय करावे,काय करू नये वरील सूचना कायदेशीर तरतुदी याबाबत पो.नि.माने सर,न.प. मुख्यधिकारी निलम कांबळे यांनी सविस्तर सूचना दिल्या.यावेळी अनेकजण मार्गदर्शन केले आहेत.
सदर मीटिंग वेळी हद्दीतील एक गाव एक गणपती साजरे करणारे मंडळांचे पदाधिकारी,सदस्य, सरपंच,पत्रकार बांधव तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.