तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना 50हजार हेक्टरी मदत द्यावी – सुभाष सिलेवाड सिरंजनीकर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर : तालुक्यातील झालेल्या पावसामुळे नुकसानीची त्वरीत पाहणी करून शेतकऱ्यांना शासनाकडुन आर्थीक नुकसान भरपायी मिळवून द्यावी.
संततधार पावसामुळे व ढग फुटी होवुन जोराचा पाऊस झाल्याने आम्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे अतिशय नूकसान झाले आहे. मौजे सिरंजनी ता. हिमायतनगर जि.नांदेड तसेच आम्हा शेतकऱ्यांनी कश्याबश्या दोन वेळेस शेतात पेरणी करुन कशी वशी पिके उमगली होती, परंतु दिनांक 19.07.2023 रोजी पासुन चालु असलेल्या
पावसामुळे पिकांचे व जमिनीचे
शेतातील असलेले छोटे मोठे कट्टे फुटुन शेतातील सर्व पिकेहि जमिनीसह खरडुन जावुन अतोनात नुकसान झालेले आहे.

आम्हा शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेतीवरच अवलंबुन असल्यामुळे व निसर्गाच्या अवकृपेमुळे तीही पिके खरडुन जावुन शेतीचे नुकसान झाल्यामुळे आम्ही शेतकरी आजघडीला मेटाकुटीस आलेलो आहोत. तरी शासन मायबापांनी आम्हा शेतकऱ्यांना

शासनाकडुन आर्थीक मदत मिळवुन दयावी. तरी मा. साहेबांनी आम्हा सिरंजनी भागातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडुन सरसगट एकरी पन्नास हजार रुपये आर्थीक नुकसान भरपायी मिळवून देण्यांची कृपा करावी हिअशी नम्र विनंती सिरंजनी चे माजी सरपंच सुभाष सिलेवाड यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी हिमायतनगर येथील तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देतांना.आविनाश अंचेटवाड ग्रामपंचायत सदस्य, पंजाब राऊत माजी तंटामुक्ती अध्यक्ष,रामा रगू राऊत,बाळु सूर्यवंशी, कैलास महाराज,शाहजी देशमाने,प्रमोद सुंकरवाड,विठल काळे,दिगांबर काळे,बाबु कनलेवाड,राम भाकरे आदीजन उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!