नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे मारतळा येथे मामा मंगल कार्यालय येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्प पूर्ती सोहळा दिनांक 9/ 9/ 2024 रोजी संपन्न झाला आहे.
प्रारंभी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वप्रथम श्री ज्ञानेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन प्रयाग गिरी महाराज व हरिभक्त पारायण राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मधील ओळी क्रमांक 1760 पासून ते ओळी क्रमांक 1811 पर्यंत वाचन करण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने महाआरती करून गुरुवर्य हरिभक्त परायण राम महाराज पांगरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आहे. प्रस्ताविक करत असताना श्री राम महाराज पांगरेकर म्हणाले आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थांच्या एकूण कार्यपद्धती व धर्माचे आचरण धर्मांची संस्कृती यासाठी काम करून मानव मुक्तीसाठी मानवी जीवनामध्ये अत्यंत धार्मिक कार्य आहे आणि हे धार्मिक कार्य हे जीवनामध्ये सुख घडून आणतो अशा विविध विषयांची माहिती श्री राम महाराज पांगरेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर गुरुवर्य प्रिया गिरी महाराज यांनी वारकरी संप्रदाय दत्त संप्रदाय व अन्य संप्रदायावर सखोल असं मार्गदर्शन करून उपस्थित भाविकांना सूक्ष्म पद्धतीने मार्गदर्शन रुपी गुरू आशीर्वाद दिले आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था ही पंढरपूर तीर्थक्षेत्र येथे धर्म शाळेसाठी भूदनासाठी गुरुप्रसाद म्हणून एक लाख रुपयांचं दान दिले आहे. व त्याचबरोबर नराश्याम महाराज येवतीकर यांनी देखील अतिशय धार्मिक कार्याची एकूण माहिती व हिंदू धर्माची संस्कृती याबाबत माहिती उपस्थित भाविकांना दिली आहे. आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लाभलेले नारायण महाराज यांचे गुरु आशीर्वाद पर मार्गदर्शन झाले असून या कार्यक्रमांमध्ये श्री महाराज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. म्हणून या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. सदर कार्यक्रमांला उपस्थित रावसाहेब महाराज शिराळे, श्री एडके, प्रभाकर महाराज, निरंजन पाटील कवडगावकर, भगवान पाटील रहाटीकर, बालाजी पाटील,महिला व पुरुषांचे मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. या कार्यक्रमाला आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे साधक भाविक भक्त व गुरुवर्य मंडळी यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण वेंकट महाराज जाधव माळकोटेकर यांनी केले.