उमरी तालुका प्रतिनिधी /उद्धव मामडे
उमरी:-नायगाव मतदार संघात पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे उमरी धर्माबाद नायगाव तसेच नांदेड जिल्हात अति शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्याने नायगाव मतदार संघाचे लोकप्रिय विकास पुरुष आमदार राजेश पवार यांनी उपमुख्यमंत्री , कृषीमंत्री जिल्हाधिकारी यांना भेटून पत्र व्यवहार करून पिक पंचनाने न करता सरसगट शेतकऱ्याना नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली होती . सरकारने महाराष्ट्रातील इतर जिल्हाचा आढावा घेवून नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी पाऊसाचा कहर बघून नांदेडचा ही समावेश केला आहे .
त्या अनुषंगाने ई पिक पाणी नको , प्रत्यक्ष पंचमाने नको सरसगट आर्थिक मदत देण्याचे कृषीमंत्री यांनी जाहीर केले आहे . फक्त ज्या शेतकरी यांचे बैल – गाय – म्हैशी , असे इतर जनावरे पाळीव प्राणी जे पुरात नुकसान त्यांचे पंचनाने करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आमदार राजेश पवार साहेबांनी नायगाव मतदार संघात थेट शेतकऱ्याच्या बांधावर जावून पहाणी केलीच पण आपण मतदार संघात किती कामाचा निधी दिला ते काम दर्जेदार होत आहे काय ? याची पहाणी केली आणि दौऱ्यातील गावात किती गावात निधीची कमतरता आहे काय ? या समस्या जानुन घेतल्या असुन भविष्यातील प्लॉन आखला आहे आमदार राजेश पवार यांचे स्वप्न नायगाव मतदार संघ ग्लोबल मतदार संघ झाला पाहिजे म्हणून प्रत्येक मुख्य गावा गावात जावून परिसरातील सरपंच / नागरीकांचे समस्या जानून घेत आहेत फक्त हा दौरा शासनाच्या विकास निधी दुरुपयोग होवू नये , किवां उनिव भासू नये हाच महत्वाचा मुद्दा होता.(चौकटीत घ्यावेत सर) त्यामुळे आ. राजेश पवार यांनी उमरी तालुक्यात दि ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी – सिधी – कारला – बितनाळ – हुंडा (उ.प ) – निमटेक बोळसा (खु) येथे पहाणी करून शिंगणापूर येथे समारोप केला आहे . कांही लोकांना या विकास पहाणीत गावचे सर्वच प्रश्न सुटावे म्हणून साहेबांचा भेटण्याचा आग्रा होता .
मात्र इतर कामासाठी , शासनाच्या योजना लाभार्थी पर्यंत पोहचल्या नाहीत निराधार यांना लाभ भेटत नाही , सध्याच्या सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना , मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना , मुख्यमंत्री वयश्री योजना वयवृद्ध यांना तिर्थक्षेत्र यात्रा योजना या संदर्भात लाभार्थी यांना कुठलीच अडचन भासू देवू नका म्हणून संबंधीत तहसीलदार , तलाठी , ग्रामसेवक यांना सक्तीच्या सुचना दिल्या आहेत जर कोणी कर्मचारी हायगयी केल्यास त्या कर्मचारी – अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याचे संकेत ही आमदार राजेश पवार यांनी दिले आहेत तसेच शासनाच्या योजनेच्या अनुदानात मध्ये बँक खाते होल्ड केल्यास तक्रार दिल्यास संबंधित बँकेवर कार्यवाही करावी अशी सुचना
उमरी तहसीलदार यांना दिल्या आहेत , आमदार राजेश पवार यांच्या विकास पहाणी दौऱ्यात तहसीलदार , सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी तलाठी , ग्रामसेवक , सरपंच , महायुतीचे भाजप – मुख्यमंत्री शिवसेना शिंदेगट , राष्ट्रवादी अजीतदाद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफासोबत होता .
मात्र आमदार राजेश पवार साहेबानी कार्यकत्यानां गावस्तर व तालुकास्तरावर तहसील / पंचायत समिती इतर विभागातील कार्य करा जो जनतेचे कामे करीत नाहीत अशा अधिकारी यांची तक्रार करा आपण ते प्रश्न सोडू किवां वरिष्ठांना कर्तव्य कसूर कर्मचारी असल्याने निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल अशा ईशारा दिला आहे .