उमरी तालुक्यात आनंदाचा शिधा कधी मिळणार?शिधा पत्रिकाधारक प्रतिक्षेत…!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनीधी /उद्धव मामडे

उमरी – तालुक्यात आनंदाचा शिधा कधी मिळणार शिधा पत्रिकाधारक शिधेच्या प्रतिक्षेत आहेत, सदर गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण दिवाळी गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य लोकांचे तोंड गोड करण्याचा निर्णय घेतला होता. ह्या शिधा वाटपाची प्रकिया हे १५ ऑगस्ट पासून ते १५ सप्टेंबर पर्यंत वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार होती, पण अध्यापही आनंदाचा शिधा शासकीय गोदामत पोहचले नाही त्यांच्यामुळे उमरी तालुक्याची शिधापत्रिका धारकांना गौरी गणपतीला मिळणारा शिधा पासून वंचित राहणाची वेळ आली आहे.सामान्य गोरगरीब जनतेचे सण उत्सव गोड व्हावे यासाठी शासनाने शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत१ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर तेल देण्याचा निर्णय घेतला. महागाईच्या काळात जगणं मुश्किल होत असताना या आनंदाच्या शिद्यामुळे लोकांना तेवढाच दिलासा मिळणार होते,पण शासनाच्या ढिसाळ नियोजनमुळे उमरी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना वंचित राहण्याची वेळ येते की काय असे परिस्थिती सध्या तरी दिसत आहे.

       उमरी तालुक्यातील अंत्योदय कार्डधारक, केशरी रेशनकार्डधारक आहेत. या सर्वांना ई-पॉस’द्वारे शिधा वितरित केला जाणार होते. गेल्या वर्षी गुडी पाडव्याला हा शिधा वेळेवर पोहचू शकले नाही,जवळपास महिन्या नंतर आनंदाचा शिधा मिळाला होता. प्रत्येक वेळेस शासनाच्या चुकीच्या नियोजनमुळे कार्ड धारकांना आनंदाच्या शिधा पासून एक ते दोन महिने वंचित राहावे लागत आहे. तरी गौरी गणपतीनिमित्त आनंदाचा शिधा वेळेवर लोकांना मिळणार कधी असा प्रश्न शिधापत्रिकाधारकांना पडला आहे. उमरी तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा’ वितरित कधी करणार शासनाच्या घोषणाना शिधापत्रिकाधारकांचे गोड तोंड होणार आहे. म्हूणन उत्सवता होते.

     यावेळेस तरी वेळेवर शिधा मिळणार अशी कार्ड धारकांमध्ये बोलले जात होते, पण शेवटी शासन्याच्या चुकीच्या नियोजनाचे कार्डधारक वंचित राहण्याची वेळ आले आहे.शासकीय गोदामामध्ये गैरी गणपती उत्सवानिमित्तचे आनंदाचे शिधा अध्यापही पोहचू शकाल नाही, शासकीय गोदामात कधी येणार ? स्वस्तधान्य दुकानदारांना कधी मिळणार? वितरण प्रणाली कधी चालू करणार? अशी चर्चा शिधापत्रिकाधारक कडून होत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!