उमरी तालुका प्रतिनिधी उद्धव मामडे
उमरी – गेली अनेक दिवसांपासून उमरी तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून वादळी पावसात नदी नाल्यांना पूर येऊन उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे पूर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने उमरी तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असे आश्वासन भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी केली आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम चांगला असताना मागील अनेक दिवसापासून उमरी तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेती जलमय होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस,ज्वारी,सोयाबीन तूर,मूग, उडीद,मका इत्यादी हातातोंडाला आलेली पिके पुराच्या पाण्यात सुसाट वाऱ्यात आडवी पडली आहेत तर संतदार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली असून गोरगरीब कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. संततधार पावसात जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.अगोदरच कर्जबाजारी असलेल्या उमरी तालुक्यातील शेतकऱ्यावर यावर्षी देखील नैसर्गिक आपत्ती कोसळली असून हातातोंडाला आलेली उभी पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.उमरी तालुक्यातील भीषण पुरस्थिती लक्षात घेऊन शासनाने उमरी तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी तसेच पडझड झालेल्या व पुराचे पाणी शिरून बेघर झालेल्या कुटुंबांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असे आवाहन भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर यांनी केला आहे.