मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबईत दाखल झाले. आज अमित शाह लालबागच्या राजाचं राजाचे दर्शन घेणार आहेत. त्याआधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन अमित शाह यांनी बाप्पांचे दर्शन घेतले आहे. दरम्यान, अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मातृभाषेबाबत महत्वाचं भाष्य केलं. ‘घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यांमध्ये मी देखील होतो’, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.