प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक काँग्रेसचे एकमत
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्याचे नवनियुक्त खाजदार स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक विधानसभाच्या सार्वत्रिक निवडणूकी सोबतच होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार (ता.९) रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस कडून स्व.खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी ह्या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे.
प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम,माजी आ.इश्वराव भोसिकर,महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणारच आहे.
ही निवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी सोबतच होण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार (ता.९) रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठक