बँक ऑफ इंडिया व उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना तीन कोटी 17 लक्ष वितरित….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी राहुल कोलते

नांदेड – नायगाव दिनांक 10 सप्टेंबर रोजी नायगाव येथील बँक ऑफ इंडिया व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साह्य म्हणून 74 समूहांना तीन कोटी 17 लक्ष कर्ज स्वरूपात वितरित करण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडिया चा 119 वा वर्धापन दिन व नायगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेचा चौदावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूह नाही आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जिल्हा अभियान व्यवस्थापन पक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम तसेच जिल्हा अभियान संचालक डॉक्टर संजय तुबाकले सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री गजानन पातेवार साहेब, श्री गणेश कवडेवार सर, श्री माधव भिसे सर, यांच्या मार्गर्शनाखाली तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नायगाव चे गटविकास अधिकारी श्री लक्ष्मण वाजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व्यवस्थापक श्री अमोल जोंधळे, तालुका व्यवस्थापक श्री बाबू डोळे, तालुका व्यवस्थापक, श्री यशवंत सूर्यकार यांनी हा बँक मला उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली आहे.

Share This Article
error: Content is protected !!