तहसीलदार धम्मपिया गायकवाड नायगाव यांची राहेर परिसरातील नुसकानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पाहनी लवकरच नुकसानीचे पंचनामे होणार धम्मपिया गायकवाड 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव – तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरात जोरदार झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला बॅक वॉटर मुळे पुराचे पाणी येऊन हजारों हेक्टर शेती हजारो हेक्टर शेती हे पिकाचे नुकसान झाले.

       या पिकाचे मोबदला शेतकऱ्यांना मिळावा व त्यांचे झालेले नुकसान भरून निघावे अशी नागरिकांची मागणी होती . त्या मागणी रास्त असून नायगाव तालुका तहसीलदार धम्मपिया गायकवाड यांनी आपली महसूल ची टीम घेऊन राहेर, हुस्सा ,सांगवी, मेळगाव , परिसराचा दौरा करून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची माहिती घेत तात्काळ तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेश करत सदर पिकाची पंचनामे सुरू करा अशी आदेशित केले . यावेळी नायगाव तालुका तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड मंडळ अधिकारी आर के पवार कुंटूर तलाठी डाकेवार राहेर ,तलाठी पांडुरंग हाके, सांगवी धनंज असे सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.

         त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. हजारो हेक्टर शेती सोयाबीन कापूस मूग उडीद अशा पिकामध्ये गोदावरी नदीच्या बॅकवॉटर पाणी व पावसाचे येणाऱ्या पाण्यामुळे सर्वत्र दोन दिवसापासून पूरस्थिती या परिसरात निर्माण झाली होती . दोन-तीन मंडळाचा पाऊस कुंटूर मंडळात दाखल झाल्याने पूर्ण पुराचे स्वरूप निर्माण झाले होते . असून हजारो शेती वाया गेली होती त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार गायकवाड यांनी बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात माहिती घेत तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशित केल्यामुळे परिसरातील नागरिक , शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!