मौजे पिंपळकौठा येथे रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी चौक स्थापन करण्यात आला.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ उध्दव मामडे

नांदेड – मुदखेड दि.13 सप्टेंबर आदिवासी अधिकार दिनाचे औचित्य साधून मौजे पिंपळकौठा येथे रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी चौकाची स्थापना करण्यात आली पिंपळकौठा येथे आदिवासी कोळी महादेव समाजाची 60% टक्के संख्या आहे. महर्षी वाल्मिकी हे कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत आहेत आणि कोळी समाज मौजे पिंपळकौठा येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करत असतात.

     मुदखेड ते पिंपळकौठा रोडवर महर्षी वाल्मिकी भवन कडे जाणारा रस्त्यावर महर्षी वाल्मिकी चौक स्थापन करण्यात आला त्यावेळी आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे मुदखेड तालुकाध्यक्ष गंगाधर दिवटेवाड, नांदेड युवा जिल्हाध्यक्ष नितीन बिचेवाड, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव दिवटेवाड, ओमकार पाटील लष्करे, ग्रामपंचायत सदस्य किरणकुमार दिवटेवाड धोंडिबा बोईनवाड, व्यंकटी उर्फ राजेश भिमलवाड , प्रकाश दिवटेवाड आदि समाज बांधव उपस्थित होते

Share This Article
error: Content is protected !!