गुंठेवारी रजिस्ट्री व नोटरी प्लॉटच्या बंद करण्यात आलेले फेरफार व घरपट्या सुरू करणे बाबत…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

परभणी जिल्हा प्रतिनिधी/

परभणी – शहरात गेल्या अडीच वर्षापासून गुंठेवारी रजिस्ट्री व नोटरी असलेल्या प्लॉटचे फेरफार व घरपट्टी देणे हे काही मुजोर अधिकाऱ्यांनी मनमानी करून जाणीवपूर्वक बंद केलेले आहे. तरी सदरील घरपट्या व पी.टी. आर.मिळत नसल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून रमाई घरकुल योजनेचे नवीन अर्ज आपल्या कार्यालयाच्या वतीने मागविण्यात आलेले नसल्यामुळे नवीन लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत आहेत. 

       त्यामुळे भविष्यात परभणीत राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजना ही आपल्या महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे बंद होऊ शकते तरी आपण या बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे,तसेच परभणी शहरातील वस्तीतून गेलेला जायकवाडी कालवा (कॅनॉल) बुजवून शहराच्या बाहेरून काढून त्या कालव्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्तीतील नागरिकांना देखील रमाई घरकुलचा लाभ देण्यात यावा. तसेच शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडणार नाही व रमाई घरकुल योजना बंद होणार नाही यासाठी तात्काळ गुंठेवारी रजिस्ट्री व नोटरी असलेल्या प्लॉटच्या घरपट्या चालू करण्यात याव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र जन आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका यांना भीमशक्तीच्या वतीने देण्यात आले आहे.

    याप्रसंगी भीमशक्ती चे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, मराठवाडा उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे,मराठवाडा महासचिव प्रा.प्रवीण कणकुटे,जिल्हाप्रमुख सतीश भिसे,जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित,युवा अध्यक्ष दत्तराव नंद,शहराध्यक्ष विक्रम काळे, संजय वाव्हळे,दीपक कणकुटे,अनिल सूर्यवंशी, सिद्धार्थ उघडे,आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..!

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!